(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Adipurush: आदिपुरुषचा टीझर आयोध्येत होणार लाँच; शरयूकाठी पार पडणार मेगा इव्हेंट
ओम राऊतनं (Om Raut) ट्विटरवर ट्वीट शेअर करुन आदिपुरुषच्या टीझर लाँचच्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे.
Adipurush: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रभासचा (Prabhas) 'आदिपुरुष'(Adipurush) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या आगामी चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर हे 2 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे रिलीज करण्यात येणार आहे. शरयू नदीच्या काठावर एक भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आलं आहे. या समारंभात आदिपुरुष या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे. आदिपुरुष चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊतनं (Om Raut) केलं आहे. ओम राऊतनं ट्विटरवर ट्वीट शेअर करुन आदिपुरुषच्या टीझर लाँचच्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे.
तगडी स्टार कास्ट
आदिपुरुष या चित्रपटामध्ये प्रभाससोबतच अभिनेत्री क्रिती सेनन, अभिनेता सनी सिंह, अभिनेता सैफ अली खान हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची घोषण दोन वर्षापूर्वी करण्यात आली होती. या चित्रपटाचं शूटिंग हिंदी आणि तेलुगू या दोन भाषांमध्ये करण्यात आलं आहे. भूषण कुमार यांच्या टी-सीरिज या कंपनीनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 12 जानेवारी 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये हा चित्रपट रिलीज केला जाईल, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटात व्हीएफएक्स आणि दमदार अॅक्शन सीक्वेन्स पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
Our magical journey is now yours to experience & love! ✨
— Om Raut (@omraut) September 27, 2022
The much awaited #AdipurushTeaser and the first poster of our film will be launched on Oct. 2!
Venue - Bank Of Sarayu, Ayodhya, UP! #Adipurush releases IN CINEMAS on January 12, 2023 in IMAX & 3D! pic.twitter.com/D5MPSHjcsn
500 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आदिपुरुष’ हा पौराणिक शैलीतील चित्रपट आहे. रामायणावर आधारित या चित्रपटात अभिनेता प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असून, अभिनेत्री क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :