(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Adipurush Controversy : 'आदिपुरुष'च्या वादादरम्यान रामायणातील सीतेचं वक्तव्य चर्चेत; दीपिका चिखलिया म्हणाल्या...
Adipurush Controversy : 'आदिपुरुष' सिनेमाच्या वादादरम्यान 'रामायण' मालिकेतील दीपिका चिखलिया यांचं वक्तव्य चर्चेत आहे.
Dipika Chikhlia On Adipurush Controversy : 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा रिलीज झाल्यापासून रामानंद सागर यांच्या रामायणात सीतेच्या भूमिकेत असणाऱ्या दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) चर्चेत आहेत. 'आदिपुरुष' सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्यांनी सिनेमातील 'राम सिया राम' या गाण्यावरील एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्या सीतेच्या लूकमध्ये दिसल्या होत्या. आता त्यांचं एक वक्तव्य चर्चेत आहे.
रामायण हे मनोरंजनाचं माध्यम नव्हे : दीपिका चिखलिया
दीपिका चिखलिया यांनी नुकतचं एका मुलाखतीत 'आदिपुरुष' सिनेमावर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या,"हिंदू महाकाव्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करणाऱ्या टीकेचा सामना करावा लागेल. रामायण हे मनोरंजनाचं माध्यम नव्हे. त्यामुळे सिनेनिर्मात्यांनी यात वेगवेगळे प्रयोग करू नये. 'आदिपुरुष' हा सिनेमा रामायणावर आधारित आहे. त्यामुळे या हिंदू महाकाव्यातील पात्रांचा, संवादाचा आणि त्यांच्या भाषेचा चुकीच्या पद्धतीने वापर करू नये".
View this post on Instagram
दीपिका चिखलिया पुढे म्हणाल्या की,"आदिपुरुष' हा सिनेमा रुपेरी पडदा किंवा टीव्हीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येईल तेव्हा त्रास होईल. आपण दर दोन वर्षांनी रामायणावर आधारित कलाकृती बनवण्याची निर्मिती का करत असतो? या गोष्टीचा मला सगळ्यात जास्त त्रास होतो. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा ग्रंथ आहे आणि हे आपले संस्कार आहेत".
दीपिका चिखलिया यांनी अजून 'आदिपुरुष' सिनेमा पाहिलेला नाही. 'आदिपुरुष' सिनेमा रिलीज झाल्यापासून त्याच्यावर टीका होत आहे. मोठ्या प्रमाणात सिनेमाला विरोध होत असल्याने आणि सिनेमासंबंधित नकारात्मक चर्चा होत असल्याने माझी सिनेमा पाहण्याची इच्छा झाली नाही, असे दीपिका म्हणाल्या.
तुमच्यासारखी सीता मातेची भूमिका कोणी करू शकत नाही; चाहत्यांच्या कमेंट्सने वेधलं लक्ष
'आदिपुरुष' रिलीज झाल्यानंतर या सिनेमाच्या वादादरम्यान रामायन मालिकेत सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्या सीतेच्या लूकमध्ये दिसत होत्या. या व्हिडीओवर तुमच्यासारखी सीता मातेची भूमिका कोणी करू शकत नाही, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या होत्या.
संबंधित बातम्या