एक्स्प्लोर
Advertisement
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने योग्य वागणूक दिली नसल्याचा अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा आरोप
एका कार्यक्रमावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने योग्य वागणूक दिली नसल्याचा आरोप मराठी चित्रपट अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने केला आहे. यासंदर्भात इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत तिने माफी मागण्याचं आवाहन केलं आहे.
चंद्रपूर : शिवसेना पदाधिकाऱ्याकडून योग्य वागणूक मिळाली नसल्याचा आरोप मराठी चित्रपट अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने केला आहे. यासंदर्भात तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले असता हा प्रकार घडल्याचं तिने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणी राजुरा विधानसभा संपर्क प्रमुखाने माफी मागावी, अशी मागणी भाग्यश्रीने केली आहे.
गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठी चित्रपट अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिला आमंत्रीत करण्यात आलं होतं. यावेळी योग्य सुविधा दिल्या नसल्याचा आरोप भाग्यश्रीने केला आहे. मी सकाळी आठ वाजता एअरपोर्टवर आले. मात्र, नऊ वाजेपर्यंत एअरपोर्टवर कोणी घ्यायला आलं नाही. ज्यावेळी त्यांची माणसं न्यायला आली त्यावेळी आम्ही आमच्या तयारीसाठी वेळ हवा असल्याचे सांगितले. मात्र, कार्यक्रमाला उशीर होईल, असं सांगत नागपुरात फ्रेश व्हायला वेळ दिला नाही. तुमच्यासाठी चंद्रपुरात हॉटेल बुक केलं आहे. तिथेच तुमची रेडी होण्याची व्यवस्था केली असल्याचे आम्हाला सांगण्यात आलं. आम्ही ज्यावेळी चंद्रपुरात पोहोचलो तेव्हा हॉटेल बुक नसल्याचं समजलं. त्यानंतर दुसऱ्या एका साध्या हॉटेला आमची व्यवस्था करण्यात आली.
रिटर्नची तिकीटं बुक केली नाहीत - चंद्रपुरात पोहचल्यानंतर तुमची तयारी तुम्हीच करा, आमच्याकडून कुठलीही सुविधा मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. तीन दिवसांपासून रिटर्न तिकिट्स बद्दल विचारलं तरी चंद्रपुरात पोहचून देखील हातात रिटर्न तिकिट्स मिळाली नाही. अडीच तास गडचांदूरच्या कार्यक्रमासाठी दिला तरीही त्यांनी 10 पर्यंत थांबण्यास फोर्स केला. पण आम्ही न जुमानता निघालो. पण आमच्या परत जाण्याबद्दल काहीच सोय केली नाही. फोन पण स्वीच ऑफ केला. खूप वादविवाद केल्यावर रिटर्न तिकीट मिळाले, अशी आपबीती भाग्यश्री मोटे हिने आपल्या व्हिडीओमधून सांगितली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने माफी मागावी - भाग्यश्री या सर्व प्रकाराला शिवसेनेचे राजुरा विधानसभा संपर्क प्रमुख मिथुन खोपडे कारणीभूत असल्याचा आरोप अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने केला आहे. या प्रकरणी त्यांनी माफी मागण्याचे आवाहन भाग्यश्रीने व्हिडीओमधून केलं आहे. संबंधित बातमी - Tanhaji Movie Review | पुरेपूर लिबर्टी घेऊन केलेली शौर्यगाथा Amitabh Bachchan | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 'दादासाहेब फाळके' पुरस्काराने सन्मानित | ABP MajhaView this post on Instagram
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement