एक्स्प्लोर
Advertisement
ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन
मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन झालं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे विनोद खन्ना यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. नुकतंच त्यांना कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. अखेर आज 70 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील हरकिशन दास रुग्णालायत त्यांनी 11 वा. 20 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.
मुंबईतील वरळी स्मशानभूमीत विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. अंत्यसंस्काराला बॉलिवूड लोटलं होतं.
विनोद खन्ना शेवटचे 'एक थी राणी' या सिनेमात दिसले होते. यापूर्वी 2015 मध्ये शाहरुख खानच्या 'दिलवाले' या सिनेमातही विनोद खन्ना पाहायला मिळाले होते.
बॉलिवूडच्या 'दयावान'चा अलविदा
या महिन्याच्या सुरुवातीलाच विनोद खन्ना यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील गिरगावच्या सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन अँड रिचर्स सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्जही मिळाला होता. मात्र प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा झाली नसल्याने, ते देखरेखीखाली होते. विनोद खन्ना यांचा आगामी सिनेमा ‘एक राणी ऐसी भी’चा ट्रेलर लाँचिंग सोहळा नुकताच पार पडला होता. बिग बी अमिताभ बच्चन या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र प्रकृती बिघडल्याने विनोद खन्ना हजर राहू शकले नव्हते. काही दिवसांपूर्वी त्यांचा रुग्णालयातील एक फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोवरुन त्यांच्या प्रकृतीचा अंदाज बांधता येत होता. विनोद खन्ना यांचा बॉलिवूडमध्ये दबदबा विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, 'अमर, अकबर, अँथोनी' यांसारख्या शानदार सिनेमात काम केलं होतं. विनोद खन्ना यांनी करिअरची सुरुवात निगेटिव्ह भूमिकेने केली होती. नंतर ते हिरो बनले. विनोद खन्ना यांनी 1971 च्या ‘हम तुम और वो’ मध्ये प्रमुख भूमिका साकारली. राजकारणातही सक्रीय विनोद खन्ना यांनी राजकीय क्षेत्रातही नशीब अवलंबलं. सध्या ते पंजाबच्या गुरदासपूर मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार होते.- 1997 साली भाजपमध्ये प्रवेश, 1998 साली पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार.
- जुलै 2002 मध्ये केंद्रीय संस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी. त्यानंतर सहा महिन्यातच केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्रीपदाची जबाबदारी
- 2004 लोकसभा निवडणुकीतून पुन्हा लोकसभेवर
- 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव
- 2014 च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेत विजयी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
बातम्या
Advertisement