एक्स्प्लोर
Shashank Ketkar: 'ज्या वाड्यात माझा जन्म झाला ...'; शशांक केतकरनं साताऱ्यातील नेने वाड्याचे फोटो केले शेअर
शशांकनं (Shashank Ketkar) साताऱ्यामधील नेने वाड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shashank Ketkar
Shashank Ketkar: अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करतो. शशांकच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. नुकतीच शशांकनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. शशांकनं साताऱ्यामधील नेने वाड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यानं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
शशांकनं शेअर केले फोटो
साताऱ्यातील नेने वाड्याचे फोटो शेअर करुन शशांकनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'सातारा. ज्या वाड्यात माझा जन्म झाला तो हा नेने वाडा. खूप आठवणी आहेत या वाड्यातल्या. काही महिन्यात आता हा पाडला जाईल आणि तिथे एका घरा ऐवजी, अनेक घरांची सात आठ मजली ईमारत उभी राहील. आता हा वाडा फक्त काही फोटोस आणि आठवणीतच शिल्लक राहिल' शशांकच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
शशांकनं शेअर केलेल्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'या वाड्यात माझ्या सारख्या अनेकांवर लहानपणी संस्कार झाले आहेत. नेने आजींकडे गीतापठण आणि मग लीमलेटची गोळी आणि आजोबांचा धाक, आदरयुक्त भिती.. अशा अनेक आठवणीदेखील जोडल्या गेलेल्या आहेत या वाड्याशी..' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'खूप छान आहे वाडा'
View this post on Instagram
शशांक हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देतो. शशांकला इन्स्टाग्रामवर 394K फॉलोवर्स आहेत.
शशांकच्या मालिका आणि चित्रपट
शशांकनं गोष्ट एका पैठणीची, 31 दिवस या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर होणार सुन मी ह्या घरची, सुखाच्या सारिंनी हे मन बावरे या मालिकांमुळे शशांकला विशेष लोकप्रियता मिळाली. शशांकच्या आगामी मालिका आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सध्या शशांकची मुरांबा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत शशांक हा अक्षय ही भूमिका साकारतो. मुरांबा मालिकेतील शशांकच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
महत्वाच्या इतर बातम्या:
आणखी वाचा























