Murabba : मुरांबा मालिकेतील व्यक्तिरेखा का आहे स्पेशल? शशांक केतकर सांगतोय प्रेमाच्या आंबट गोड मुरांब्याची गोष्ट
शशांक केतकरनं (Shashank Ketkar) मुरांबा मालिकेविषयी माहिती दिली आहे
Murabba : मुरांबा (Murabba) मालिकेविषयी शशांक केतकरनं (Shashank Ketkar) माहिती दिली आहे. तो म्हणाला, 'मुरांबा या शीर्षकाप्रमाणेच एक छान आंबट-गोड लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कौटुंबिक गोष्ट आहे. नात्यांमधले ऋणानुंबध त्यातला गुंता यावर भाष्य करणारी गोष्ट आहे. जवळपास दीड वर्षांनंतर लव्हस्टोरी घेऊन भेटीला येतोय. स्टार प्रवाह वाहिनीचे मनापासून आभार त्यांनी प्रवाह दुपारच्या माध्यमातून आता दुपारीही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा प्रवाह सुरु केला आहे. १४ फेब्रुवारीला मालिका सुरु होतेय त्यामुळे जे प्रेमात आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना प्रेमात पडायचं आहे त्यांच्यासाठी मुरांबा ही मालिका छान गिफ्ट असेल.'
'मी आणि माझी बायको प्रियांका नुकतेच आई-बाबा झालो. आई-बाबा झालो असलो तरी पूर्वीसारखंच फिट रहायचं आहे. वेटलॉस नाही मात्र फॅटलॉस केला आहे. त्यामुळे नव्या रुपात आणि नव्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटणार आहे.' असं मालिकेविषयी शशांकनं सांगितलं.
मलिकेतील भूमिकेविषयी शशांक म्हणाला,'मी बऱ्याच दिवसांपासून रोमँटिक भूमिकेची वाट पहात होतो. भुमिकेच्या बाबतीत तुम्ही कितीही वेगळा प्रयोग करायला गेलात तरी लव्हस्टोरीची गोष्टच वेगळी आहे. प्रेक्षकांना लव्हस्टोरी आपलीशी वाटते. मालिकेच्या नावाप्रमाणेच एक आंबट-गोड लव्हस्टोरी आहे. मुरांबा ज्याप्रमाणे मुरला की त्याची चव वाढते अगदी त्याचप्रमाणे मालिकेत नाती मुरताना तुम्ही अनुभवाल. स्टार प्रवाहवसोबत जवळपास ८ वर्षांनंतर काम करतोय. स्टार प्रवाह नंबर वन वाहिनी आहे. त्यामुळे या वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करताना खूप मजा येतेय.'
'अक्षय मुकादम असं व्यक्तिरेखेचं नाव आहे. आईवर जीवापाड प्रेम करणारा आणि आजीच्या धाकाखाली वाढलेला असा हा अक्षय. अक्षयला नाती जपायला आवडतात. अक्षय उत्तम शेफही आहे. शशांक आणि अक्षय या दोघांमधलं साम्य असं ती म्हणजे खवय्येगिरी. स्वयंपाक घरात नवनवे प्रयोग करायला मला आवडतात. मालिकेत देखिल माझं स्वयंपाक घराशी जवळचं नातं असणार आहे.स्टार प्रवाहच्या सर्वच मालिकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेमापोटी स्टार प्रवाह वाहिनीने प्रवाह दुपार हा नवा स्लॉट सुरु केला आहे. लग्नाची बेडी आणि मुरांबा या दोन मालिका दुपारच्या वेळेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. मुरांबाची वेळ दुपारी 1.30 वाजताची आहे. सहकुटुंब जेवणाचा आनंद घेत प्रेक्षकांना ही मालिका पहाता येईल.' असंही शशांकनं सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- Uttarakhand Election 2022: उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपच्या 59 उमेदवारांची यादी जाहीर, पाहा कुणाला मिळाली संधी
- AAP, Goa CM Face: गोव्यात आपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित, अमित पालेकरांच्या नावाची घोषणा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha