एक्स्प्लोर
अभिनेते जितेंद्र यांच्या चुलत भावाची आत्महत्या
मुंबई : प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांचे चुलत बंधू आणि दाक्षिणात्य अभिनेत्री जयासुधाचे पती नितिन कपूर यांनी मुंबईत राहत्या घरी आत्महत्या केली आहे. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारून त्यांनी आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन कपूर दुपारी 1.45 वाजता अंधेरी वेस्टमधील राहत्या घरी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर गेले. तेथून उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते.
नितीन कपूर यांचं कुटुंब सध्या हैदराबादमध्ये असून या घटनेची त्यांना माहिती देण्यात आली आहे. नितीन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नितीन यांचा विवाह प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री जयासुधा यांच्याशी 1985 साली झाला होता. 58 वर्षीय नितीन कपूर यांनी अनेक सिनेमांची निर्मीतीही केली आहे. त्यांच्या पाश्चात पत्नी जयासुधा, निहार आणि श्रेयान ही दोन मुलं आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement