Bigg Boss Marathi 6: अपेक्षा खऱ्या ठरल्या! बिग बॉस मराठी सिझन 6 येणार, कलर्स मराठीवर लवकरच मनोरंजनाचं दार उघडणार
कलर्स मराठीकडून सादर करण्यात आलेल्या खास टीझरमध्ये प्रेक्षकांना यंदाच्या सीझनच्या थीमचा सर्वात महत्त्वाचा संकेत मिळाला तो म्हणजे दरवाजा

Bigg Boss Marathi 6: मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा व सर्वाधिक प्रतीक्षित रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) आपला सहावा सीझन घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. अख्खा महाराष्ट्र काय तर संपूर्ण जगभारत ज्याची चर्चा असते, ज्याची आपण सगळेच आतुरतेने वाट बघतो त्या पर्वाची चाहूल लागताच चर्चांना उधाण येतं आणि उत्सुकता शिगेला पोहचते. आता त्या घराचा दरवाजा पुन्हा उघडणार, एंटरटेनमेंटचा बार पुन्हा उडणार. प्रत्येक वर्षीप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात हजारो प्रश्न घोळू लागले आहेत. यंदाचा USP काय असेल? थीम काय असेल? सदस्य कोण असतील? घर कसे असेल? यंदाचा गेम प्लॅन काय असणार? आणि बरंच काही... तसेच यावेळेस सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजे रितेश देशमुख करणार का? भाऊचा कट्टा पुन्हाएकदा घराघरात पाहायला मिळणार का ? या सर्व प्रश्नांमुळे बिग बॉसच्या पुनरागमनाची वारे सगळीकडे वाहू लागले आहेत.
कलर्स मराठीकडून सादर करण्यात आलेल्या खास टीझरमध्ये प्रेक्षकांना यंदाच्या सीझनच्या थीमचा सर्वात महत्त्वाचा संकेत मिळाला तो म्हणजे दरवाजा. या वेळी एक नाही तर अनेक दरवाजे असणार आहेत. यावेळेसचा खेळ अजूनच धमाकेदार होणार आहे हे निश्चित ! दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार... बिग बॉस मराठी सिझन 6 लवकरच कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर!.
टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
या वर्षीच्या बिग बॉस मराठी सिझन 6 च्या टीझरमध्ये एकाच दाराऐवजी अनेक दरवाजे दिसतात, आणि याच क्षणी प्रेक्षकांची उत्सुकता क्षणात वाढते. खरं काहीच उघड न करता टीझर प्रेक्षकांना थेट गुंतवून ठेवतो. दारांमधून येणारा प्रकाश, त्यांची अनोखी रचना आणि रहस्यमय वातावरण हे फक्त एकच सांगतं या सीझनमध्ये काहीतरी खूप वेगळं घडणार आहे.
View this post on Instagram
सध्या या सिझनबद्दलची सर्व माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून ती लवकरच उलगडणार आहे. सदस्यांची नावे, घराची पहिली झलक, थीमची अधिकृत घोषणा आणि या वर्षीचे मोठे ट्विस्ट हे सर्व लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहेत. महाराष्ट्रभर पुन्हा एकदा “Bigg Boss आदेश देत आहेत!” हा आवाज घुमण्याच्या तयारीत आहे आणि मनोरंजनाचा बाप बिग बॉस मराठी सिझन 6 लवकरच परततोय फक्त कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर!























