Video : भरत जाधव, गौरव मोरे अन् निखिल चव्हाणचा लंडनच्या रस्त्यावर ‘हेराफेरी’ परफॉर्मन्स; धमाल व्हिडीओ पाहिलात का?
सध्या भरत जाध, निखिल चव्हाण आणि गौरव मोरे त्यांच्या आगामी ‘लंडन मिसळ’ (London Misal) या चित्रपटासाठी लंडनमध्ये शूटिंग करत आहेत.
Marathi Actors Funny Video : मराठी कलाकार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घडमोडी ते सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहत असतात. तर, कधी कधी धमाल व्हिडीओ शेअर करून ते प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू देखील आणतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. या धमाल व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओ अभिनेते भरत जाधव (Bharat Jadhav), निखिल चव्हाण (Nikhil Chavan) आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे (Gaurav More) धमाल करताना दिसत आहेत.
सध्या भरत जाधव, निखिल चव्हाण आणि गौरव मोरे त्यांच्या आगामी ‘लंडन मिसळ’ (London Misal) या चित्रपटासाठी लंडनमध्ये शूटिंग करत आहेत. या शूटिंगमधून थोडासा वेळ काढून ते सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांना लंडनची झलक दाखवत असतात. मात्र, त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओने चाहत्यांना हसता हसता आठवणींमध्ये रमायला लावलं आहे.
पाहा व्हिडीओ :
या व्हिडीओत हे तीनही कलाकार ‘फिर हेराफेरी’ या चित्रपटातील एका धमाल गाण्यावर व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. ‘ए मेरी मेरी जोहरांजबी’ या धमाल गाण्यावर तिघे परफॉर्म करतायत. सुरुवातीला भरत जाधव एक स्टँड माईक घेऊन गाणं गायला सुरुवात करतात. इतक्यात निखिल चव्हाण आणि गौरव मोरे देखील माईक खेचून गाणं सुरु करतात. या तिघांची ही धमाल प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू देऊन गेली आहे. तर, या तिघांना पाहून प्रेक्षकांना ‘फिर हेराफेरी’मधील परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांची आठवण आली आहे. मराठीमध्ये ‘हेराफेरी’ तयार करा आणि त्यात याच तिघांना मुख्य भूमिकेत घ्या, अशी मागणी चाहत्यांनी केली आहे.
रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेवर आधारित चित्रपट
जालिंदर गंगाराम कुंभार दिग्दर्शित 'लंडन मिसळ' (London Misal) या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली होती. तेव्हापासूनच हा चित्रपट चर्चेत आला आहे. हटके नाव, विनोदी कलाकार आणि लंडनचं लोकेशन यामुळे हा चित्रपट नेमका कसा असेल, यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहीलेल्या एका नाटकावरून प्रेरित होऊन या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये सुरु असून वर्षअखेरीस 'लंडन मिसळ' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :