Anupam Kher : अनुपम खेर यांनी रिक्षामधून केली सफर; व्हिडीओ शेअर करुन म्हणाले, 'ड्रायव्हर दुबे जी आणि मुंबईचे रस्ते'
अनुपम खेर (Anupam Kher) यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ दोन लाख 37 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

Anupam Kher Viral Video : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकताच अनुपम यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ दोन लाख 37 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
अनुपम खेर यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, ते मुंबईमध्ये रिक्षामधून सफर करत आहे. तसेच अनुपम हे रिक्षा चालक आणि काही मुलांसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. अनुपम यांनी त्यांना भेटलेल्या काही मुलांना मिठाई देखील दिली. या व्हिडीओला अनुपम यांनी कॅप्शन दिलं, 'रिक्षामधून सफर, माझे मॉर्निग वॉकचे मित्र, ड्रायव्हर दुबे जी आणि मुंबईचे रस्ते '
व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती
अनुपम यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. एका नेटकऱ्यानं व्हिडीओला कमेंट करुन लिहिले, 'तुम्ही बॉलिवूडमधील सर्वांत चांगले हिरो आहात.' तर दुसऱ्यानं कमेंटमध्ये लिहिलं, 'सर तुम्ही खूप दयाळू आणि नम्र आहात.'
View this post on Instagram
अनुपम खेर यांचा 523 वा चित्रपट आयबी 71 (IB 71) हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनुपम यांनी काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या शूटिंग सुरूवात केली.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
