एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात ‘भूल भुलैय्या’चा थरार! राखी जुली मंजुलिका, संकेत ‘कवी कुमार’; प्रभूचा वेडा लव्हर अवतार चर्चेत

बिग बॉस मराठीच्या घरात प्रत्येक दिवस नवं समीकरण घेऊन येतो. त्यामुळे या हलक्याफुलक्या टास्कमधूनही खेळाला एखादं वेगळं वळण मिळतं का, हे पाहणं रोचक ठरणार आहे.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरात येणाऱ्या भागात प्रेक्षकांना एक भन्नाट आणि वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य वेगवेगळ्या हटके पात्रांच्या अवतारात दिसत असून घरात अक्षरशः ‘भूल भुलैय्या’सारखी मजेशीर धमाल रंगताना दिसते. या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याला एक खास पात्र दिलं गेलं आहे. त्यामुळे घरातील वातावरण काही काळासाठी पूर्णपणे बदललेलं दिसतं. कधी कविता, कधी नाट्यमय एंट्री तर कधी वेडसर गमतीजमती अशा सगळ्या प्रकारांनी घरात हशा आणि गोंधळ दोन्ही निर्माण होणार असल्याची झलक प्रोमोमध्ये पाहायला मिळते.

या सगळ्या रंगतदार वातावरणात संकेत पाठक ‘कवी कुमार’ या अनोख्या अवतारात दिसतो. या भूमिकेत तो घरात कविता सादर करताना दिसणार आहे. त्याच्या कविता ऐकून घरातील सदस्य खळखळून हसतील की थोडेसे कंटाळतील, हे पाहणंही तेवढंच मजेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे, संकेतच्या कवितांवर घरातील सदस्यांच्या प्रतिक्रिया देखील तितक्याच मजेदार असणार असल्याचं प्रोमोमधून दिसून येतं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अलीकडेच झालेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये संकेतने दमदार खेळ दाखवला होता. जरी कॅप्टन्सी त्याच्या वाट्याला आली नसली, तरी त्या टास्कमध्ये त्याची उपस्थिती आणि खेळ प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. त्यामुळे आता ‘कवी कुमार’ या हलक्याफुलक्या अवतारात तो घरात काय मजा आणतो, हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान, राखी सावंत ‘जुली मंजुलिका’ या पात्रात दिसणार आहे. तिचा नेहमीचा नाट्यमय अंदाज या पात्रात आणखी रंग भरताना दिसतो. तिच्या एंट्रीमुळे घरात गोंधळ, नाट्य आणि हास्य एकाच वेळी पाहायला मिळणार असल्याची झलक प्रोमोमध्ये दिसते.

'खुली मंजुलिका' रुचिताचा वेगळा अंदाज 

तर रुचिका ‘खुली मंजुलिका’ बनून घरात एक वेगळाच अंदाज घेऊन येते. तिचा मस्तीखोर आणि थोडासा वेडसर स्वभाव या पात्राला अजून रंगतदार बनवतो. याशिवाय प्रभू ‘वेडा लवर’ या भूमिकेत दिसणार आहे. या पात्रामुळे घरात अजून काही मजेशीर प्रसंग घडताना दिसणार आहेत. या सगळ्या वेगवेगळ्या पात्रांमुळे बिग बॉस मराठीचं घर काही काळासाठी जणू एखाद्या मजेदार नाटकाच्या रंगमंचात बदलल्यासारखं वाटतं. कविता, नाट्य, वेडेपणा आणि विनोद यांचं मिश्रण प्रेक्षकांसाठी एक वेगळाच मनोरंजनाचा अनुभव घेऊन येणार आहे.

आता ‘कवी कुमार’ म्हणून संकेत काय कविता सादर करणार आणि त्यावर घरातील सदस्य कशा प्रतिक्रिया देणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. या टास्कमधून घरात अजून कोणते मजेशीर प्रसंग घडतात, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.बिग बॉस मराठीच्या घरात प्रत्येक दिवस नवं समीकरण घेऊन येतो. त्यामुळे या हलक्याफुलक्या टास्कमधूनही खेळाला एखादं वेगळं वळण मिळतं का, हे पाहणं रोचक ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
Kala Hiran The Battle for Legacy: हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
Kiran Rao Supports Sonam Wangchuk: आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
Adinath Kothare And Urmila Kanetkar Net Worth: आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget