एक्स्प्लोर

Tandav | "कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता", अॅमेझॉन प्राईमने मागितली माफी

तांडव या वेबसिरीजमुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्याबद्दल अॅमेझॉन प्राईमने माफी मागितली आहे. अॅमेझॉनने या बाबतचे अधिकृत निवेदन जारी केले आहे.

मुंबई :  अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर नुकतीच रिलीज झालेली वेबमालिका 'तांडव' वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या मालिकेमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान 'तांडव'शी संबंधित कोणत्याही कलाकार किंवा अन्य व्यक्तीने अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. वाढत्या राजकीय वादावादी आणि पोलिसांच्या तक्रारीत अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने देखील या प्रकरणावर मौन बाळगले होते. मात्र आता या वेबसिरीजमुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्याबद्दल अॅमेझॉन प्राईमने माफी मागितली आहे. अॅमेझॉनने या बाबतचे अधिकृत निवेदन जारी केले आहे.

अॅमेझॉनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही प्रदर्शित केलेल्या तांडव या वेबसिरीजमध्ये काही दृश्य प्रेक्षकांना आक्षेपार्ह वाटली. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नव्हता. आम्ही प्रेक्षकांच्या भावनांचा सन्मान करतो. आता ती आक्षेपार्ह दृश्य वगळण्यात आली आहे.

दिग्दर्शक अली अब्बास झफरला हायकोर्टाचा अंतरिम दिलासा

मुंबईसह उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशमधील हजारातगंज पोलीस ठाण्यात तांडव वेबसीरिजच्या निर्मात्यांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्राबाहेरील प्रकरणांत अटक होऊ नये त्यासाठी दिग्दर्शक अली अब्बास झफर, निर्माते हिमांशू मेहरा आणि लेखक गौरव सोलंकी यांनी ट्रान्झिट अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायलयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर बुधवारी तातडीने न्यायमूर्ती पी. डी नाईक यांच्या समोर सुनावणी पार पडली. तेव्हा, कोरोनाच्या पाश्रवभूमीवर उत्तर प्रदेशातील न्यायालयात नियमित अटकपूर्व जामीन अर्ज करता यावा म्हणून दिलासा देण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांच्यावतीनं करण्यात आली. तर हिंदू देवतांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखविण्यात आलेला भाग वेबसीरिजमधून काढण्याच्या तयारीत असल्याचंही निर्मात्यांकडून सांगण्यात आलं. तसेच उत्तर प्रदेशातील कोर्टात नियमित अटकपूर्व जामीन अर्ज करता यावा म्हणून चार आठवड्याचा अवधी न्यायालयाकडे मागण्यात आला होता. या संबधित गुन्हाची नोंद लखनऊच्या हजारातगंज पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. त्या एफआयआरची प्रत वगळता न्यायालयात कोणतेही कागद पत्र सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे इथं अटकेची कोणतीही भीती नसल्याचा दावा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आला. त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं उत्तर प्रदेशातील कोर्टात नियमित अटकपूर्व जामीन अर्ज करता यावा म्हणून तिघांनाही 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तीन आठवड्यांसाठी ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर करत त्यांना दिलासा दिला आहे.

अली अब्बास जफर हा तांडवचा दिग्दर्शक आहे. सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर यांच्या या सीरीजमध्ये प्रमुख भूमिका आहेत. राजकारणावर आधारित या सीरीजमध्ये एका कॉलेजच्या गँदरिंगमध्ये नाटकात देवदेवतांच्या संवादाचं दृश्य आहे. सध्याचा वाद त्यावरुनच सुरु आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
Mahesh Manjrekar On Aamne Samne: 'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
Yo Yo Honey Singhs nephew Death: हनी सिंगवर दु:खाचा डोंगर; पुतण्याचा भीषण कार अपघातात मृत्यू, मित्राचाही जीव गेला, रॅपरची भावूक पोस्ट
हनी सिंगवर दु:खाचा डोंगर; पुतण्याचा भीषण कार अपघातात मृत्यू, मित्राचाही जीव गेला, रॅपरची भावूक पोस्ट
Pooja Birari and Usha Nadkarni Serial: आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा; उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार, पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?
आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा; उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार, पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Embed widget