एक्स्प्लोर

'तांडव' वादावर विवेक अग्निहोत्री यांची प्रतिक्रिया, म्हणाले, हिंदूंच्या भावना दुखावण्याचा विदेशी कट

Taandav Controversy वाढत्या राजकीय वाद-विवाद आणि पोलिस तक्रारींदरमन्या अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने स्वतः या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगले आहे. परंतु, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी एबीपी न्यूजशी बोलताना बहुसंख्य हिंदूंच्या विरोधात विदेशीशक्तीचा कट असल्याचे सांगितले.

मुंबई : अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर नुकतीच रिलीज झालेली वेबमालिका 'तांडव' वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या मालिकेमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान 'तांडव'शी संबंधित कोणत्याही कलाकार किंवा अन्य व्यक्तीने अद्याप कोणतेही विधान प्रसिद्ध केलेले नाही. वाढत्या राजकीय वादावादी आणि पोलिसांच्या तक्रारीत अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने देखील या प्रकरणावर मौन बाळगले आहे. मात्र, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी एबीपी न्यूजशी बोलताना बहुसंख्य हिंदूंच्या विरोधात हा बाहेरच्या शक्तींचा कट असल्याचे सांगितले आहे.

एबीपी न्यूजशी बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, "मी बोलण्याच्या स्वातंत्र्याच्या बाजूने आहे. याअंतर्गत, कोणीही काहीही बोलू किंवा तयार करू शकतो. मात्र, हे स्वातंत्र्य तेव्हा चुकीचे ठरते जेव्हा जाणीवपूर्वक मोहीम राबवून एखादा देश, संस्कृती अथाव गटाविरूद्ध वापरले जाते. आता मला खात्री पटत आहे, की या सर्व गोष्टी एका डिझाइन केल्याप्रमाणे घडत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मला एक राजकीय शस्त्र म्हणून वापरलं जात आहे आणि यासाठी तिथं बसलेले एक्जीक्यूटिव जबाबदार आहेत.

विवेक म्हणतात, "यापैकी बहुतेक मोठे ओटीटी प्लॅटफॉर्म अमेरिकन असून यात चीन आणि मध्य पूर्वचं पैसे आहेत. त्यामुळे या ओटीटी प्लॅटफॉर्मवर भारताची संस्कृती, वारसा, भविष्य किंवा या देशाच्या सामर्थ्यामध्ये रस नाही. त्यांचे हित जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचवायचे. अशा ओटीटी प्लॅटफॉर्मवर बसलेले अधिकारी हे सर्व डावे विचारसरणीचे आहेत आणि त्यांनी त्यांच्या राजकीय अजेंड्याविरूद्ध ओटीटी वापरण्यास सुरुवात केली आहे जे चुकीचे आहे आणि मलाही त्यास विरोध करायचा आहे. "

धार्मिक चिन्हे वापरुन काहीतरी बोलणे चुकीचे आहे काय? विवेक अग्निहोत्री म्हणतात, "हिंदू लोक भगवान शिवाबद्दल वेगळ्या पद्धतीने चर्चा करतात. गणेश देवाबद्दलही बोलतात. पण जर तुमचा हेतू स्पष्ट असेल आणि तुम्ही फक्त ह्यूमर आणि क्रिएटिव्ह लिबर्टीसाठी त्यांचा आपण वापर करत असल्यास, मला असे वाटत नाही की देशातील कोणालाही यावर काही आक्षेप आहे. खरा आक्षेप तेव्हा येतो जेव्हा लोकांना यापाठीमागचा खरा हेतू काय समजतो. एखादं मुलदेखील त्यामागचा हेतू सांगू शकतो."

'तांडव'मध्ये चित्रित केलेल्या गोष्टींबद्दल नाराजी व्यक्त करताना विवेक विचारतात, "शेतकरी आंदोलन, शाहीन बाग, दलित चळवळ, लिंचिंग यासारख्या घटना भारतात घडतात का? अशा गोष्टी पुन्हा पुन्हा दाखवून बहुसंख्य समाजाला खिजवणे, त्यांचा विश्वास खंडित करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे, जर तुम्ही डावी भाषा बोलत असाल तर ओटीटीचे अधिकारी तुम्हाला सहजपणे काम देतील आणि जर तुम्ही राष्ट्राची भाषा बोलू लागला आणि बहुसंख्यांविषयी बोलू इच्छित असाल तर त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणार नाही."

विवेक म्हणतात, "हिंदू प्रतीकच का वापरली गेली आहेत आणि तीसुद्धा अशा आक्षेपार्ह मार्गाने? हे लोक दुसर्‍या धर्माची चिन्हे वापरुन का बोलत नाहीत?" विवेक म्हणतात की जर धर्म हा राजकीय हेतू पूर्ण करण्यासाठी वापरला जाईल तर त्याची प्रतिक्रिया देखील होईल आणि 'तांडव' संदर्भात आता हे घडत आहे.

काश्मिरी पंडितांवर ‘द काश्मीर फाइल्स’ या पुढच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणारे विवेक आपल्या चित्रपटाविरोधात जारी केलेल्या फतव्याविषयी म्हणतात, "मली अशा कोणत्याही फतवे आणि धमक्यांना घाबरत नाही."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP MajhaGavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget