एक्स्प्लोर

'आम्ही एकमेकांसाठी बनलेलो नाही', लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी विजय अन् रश्मिका असं का म्हणाले?

Rashmika Mandanna Vijay Deverakonda bridal advertisement viral video: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा विवाहबंधनात अडकले असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Truth behind Rashmika Vijay shocking statement after marriage: साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्न सोहळ्यातील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.   दोघांच्या फोटोंवर चाहत्यांनी  कमेंट करुन शुभेच्छांचा वर्षाव केला. दोघांच्या राजेशाही लूकवर चाहते फिदा झाले आहेत. दरम्यान,  लग्नाच्या तीन दिवसांनंतर  या कपलने एक धक्कादायक वक्तव्य केलं. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'आम्ही एकमेकांसाठी बनलो नाही', असं दोघांनी म्हटलं आहे. त्यांनी असं नेमकं का म्हटलं? असा प्रश्न चाहते तसेच नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, दोघांनी जाहीरातीसाठी असं म्हटलं असल्याचं समोर आलं आहे. सध्या त्यांनी शूट केलेली जाहीरात सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांची एक जाहिरात सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.  या जाहिरातीच्या शूटची झलक अभिनेत्रीनं शेअर केलेल्या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे.  या जाहिरातीत, रश्मिका लाल रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. तर, विजय क्रीम रंगाच्या शेरवानीत देखणा दिसत आहे. दोघांमधील केमिस्ट्री उत्तम दिसत आहे.  या जाहिरातीत दोघेही गाणे गाताना, एकमेकांबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. आम्ही एकमेकांसाठी बनलेलो नाही, असं म्हणताना दिसत आहेत. त्यानंतर दोघेही - 'आपण एकमेकांसाठी बनलेलो आहोत', असं  म्हणताना दिसत आहेत. 

या जाहिरातीचा व्हिडिओ शेअर करताना रश्मिकाने तिच्या भावना कॅप्शनद्वारे व्यक्त केल्या, 'या जाहिरातीचा शूटिंग करताना आम्हाला सर्वात जास्त मजा आली. कारण सेटवर आम्ही दोघेच होतो. आम्ही तेच करत होतो, जे आम्हाला सर्वात चांगलं जमतं,  ती गोष्ट म्हणजे.. मस्ती करणे.. कदाचित एकमेकांसाठी असणं, यालाच मेड फॉर इच अदर म्हणतात. ते आमच्यासारखे नव्हतं, कदाचित त्यामुळेच ते इतकं खास वाटलं. ही आमची छोटीशी कहाणी'. सध्या या जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ही जाहिरात डिजायनर ब्रायडल ब्रँडसाठी  होते.  यापूर्वी दोघेही एका आंघोळीच्या साबणाच्या जाहिरातीत दिसून आले होते. एका नवविवाहित जोडप्याची भूमिका साकारताना एकत्र दिसले होते. चाहत्यांना ती जाहिरात खूप आवडली होती. उदयपूर येथे पारंपारिक विवाह सोहळ्यानंतर हे जोडपे पुन्हा हैदराबादला परतले. नुकतंच त्यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानम मंदिराला भेट दिली. मंदिरातून बाहेर पडताना ते खूप आनंदी दिसत होते. त्यांनी एकत्र येऊन अन्नदान केले तसेच मिठाई वाटप केली. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget