एका मुलाखतीत सैफनं या वास्तूबाबतची रंजक माहिती सांगितली होती. वडील, टायगर पतौडी यांच्या निधनानंतर निमराणा हॉटेल्स, अमन नाथ आणि Francis Wacziarg यांनी पॅलेसरुपी हॉटेल चालवण्याची जबाबदारी घेतली होती. ज्यानंतर त्यांच्याकडून ही वास्तू परत मिळवण्यासाठी सैफला अमाप पैसे मोजावे लागले होते.
2/7
खुद्द अभिनेता सैफ अली खान याची वडिलोपार्जित वास्तू असणाऱ्या पतौडी पॅलेसमध्ये हे चित्रीकरण करण्यात आलं होतं.
3/7
पतौडी पॅलेसमध्ये यापूर्वीही अनेक चित्रपट आणि सीरिजचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. पांढऱ्या शुभ्र रंगाची ही वास्तू म्हणजे एका आलिशान वास्तूचा उत्तम नमुनाच.
4/7
वारसा हक्क म्हणून अपेक्षित असणाऱ्या या भव्य वास्तूसाठी सैफला त्याने आतापर्यंत अभिनय कारकिर्दीतून कमवलेले पैसे मोजावे लागले होते.
5/7
हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याच्या आरोप करत या वेब सीरिजवर बंदी आणण्याची मागणी अनेक भाजप नेत्यांनी केली आहे.
6/7
इथं सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'तांडव' या वेब सीरिजचं चित्रीकरण, त्याच्या आलिशान अशा वडिलोपार्जित घरात म्हणजेच पतौडी पॅलेस इथं करण्यात आलं.
7/7
अभिनेता सैफ अली खान याची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या 'तांडव' या वेब सीरिजबाबतचे वाद कलाविश्वात अनेक चर्चांना वाव देत आहेत. यातच एक महत्त्वाची बाब म्हणजे, वादाच्या भोवऱ्यात अडकलेली ही वेब सीरिज आणखी एका कारणामुळं प्रकाशझोतात आली आहे. हे कारण म्हणजे तिचं चित्रीकरण झालेलं ठिकाण.