Aishwarya Sharma Cryptic Post On Divorce Rumors: घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगला वैतागली ऐश्वर्या; क्रिप्टिक पोस्टमधून ठणकावून सांगत म्हणाली...
Aishwarya Sharma Cryptic Post On Divorce Rumors: ऐश्वर्याने शर्मानं तिच्या सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्या स्टोरीमध्ये तिनं तिला होणाऱ्या सततच्या ट्रोलिंगवर भाष्य केलंय.

Aishwarya Sharma Cryptic Post On Divorce Rumors: टेलिव्हिजनवरची (Television News) सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या शर्मानं (Aishwarya Sharma) छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवली आणि फारच कमी वेळात प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचली. पण, ऐश्वर्याच्या प्रोफेशनल लाईफपेक्षाही तिच्या प्रोफेशनल लाईफच्या चर्चा सर्वाधिक रंगल्याचं पाहायला मिळालं. गेल्या कित्येक दिवसांपासून ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या (Aishwarya Sharma Divorce) चर्चांनी जोर धरला आहे. ऐश्वर्या आणि तिचा पती नील भट्ट (Neil Bhatt) लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. या सर्वांत अभिनेत्रीनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. सध्या ही पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान, ऐश्वर्यानं ही क्रिप्टिक पोस्ट (Aishwarya Sharma Cryptic Post) आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर शेअर केली आहे. ज्यामध्ये तिनं तिला ट्रोल करणाऱ्यांवर आणि सातत्यानं तिच्या घटस्फोटाबाबतच्या चर्चांवर निशाणा साधला आहे.
ऐश्वर्या शर्मा काय म्हणाली? (Aishwarya Sharma On Divorce Rumors)
ऐश्वर्याने शर्मानं तिच्या सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्या स्टोरीमध्ये तिनं लिहिलंय की, "लोक माझ्या आयुष्याबाबतीत स्वत:चीच मतं बनवत आहेत. मी केलंय का, कोण आहे मी? हे सगळं जाणून न घेता काहीही बोलत आहेत. काही लोक तर कर्मा आहे, असंही म्हणत आहेत. मात्र यावर विश्वास ठेवण्यापूर्वी माझ्यासोबत काम केलेल्यांना माझ्याबद्दल विचारुन पाहा. माझ्या कोस्टार्सना विचारा, निर्मात्यांना विचारा. सेटवरील कोणत्याही व्यक्तीला विचारा की मी कधी कोणाला त्रास दिलाय का कोणाला दुखवलं आहे, अपमान केला आहे? एकदाही नाही. मी सेटवर फक्त प्रोफेशनलिज्म मेटेंन ठेवलंय..."

"जेव्हापासून माझा साखरपुडा झाला आहे तेव्हापासून मीच विनाकारण ट्रोल होत आले आहे. ही गोष्ट मी हसण्यावर नेली. पण कोणीही त्याबद्दल बोललं नाही. कोणी म्हटलं नाही की माझ्यासोबत चुकीचं होत आहे. ही गोष्ट कोणी कधीच का पाहिली नाही? याहून वेगळं म्हणजे अनोळखी लोक मला मेसेज पाठवत आहेत, युट्यूब लिंक पाठवत आहेत जिथे जिथे विनाकारण माझं नाव जोडलं जात होतं. मी कोणाला त्रास दिला, कोणाच्या कानाखाली मारली आणि कोणासोबत गैरवर्तन केलं असं लिहिलं होतं. जेव्हा की असं काहीच घडलं नव्हतं.", असंही ऐश्वर्या आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हणाली आहे.
अभिनेत्रीनं ट्रोलर्सना झोडपलं (Aishwarya Sharma Cryptic Post)
पुढे बोलताना ऐश्वर्या म्हणाली की, "मी नेहमीच शांत बसले पण याचा अर्थ हा नाही की मी चुकीची आहे. मी स्पष्ट सांगते की, मी आयुष्यात कधीच कोणाला त्रास दिला नाही. लोक आपल्या फायद्यासाठी खोटं पसरवतात आणि त्यांनी आपल्या कर्माकडे बघितलं पाहिजे. तुम्ही मानसिक स्वास्थ्याबद्दल बोलता पण कोणाला चुकीचं ठरवण्याआधी एकदा विचार कर करा. काही लोकांना शांत बसणं योग्य वाटतं ज्यात मीही आहे. पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही काहीही बोलाल. मी माझ्या स्वाभिमानासाठी स्वत: उभी राहीन."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























