Aishwarya Gets Engaged : ऐश्वर्याचा साखरपुडा संपन्न, दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात; पाहा फोटो
Aishwarya Gets Engaged : काही सेलिब्रेटींनी विवाहाच्या घट्ट नात्यात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूडप्रमाणे कॉलीवूडमध्येही लगीनघाई सुरू असल्याचे चित्र आहे.

Aishwarya Gets Engaged : बॉलिवूडमध्ये सध्या अनेक जोडपी विवाहबंधनात अडकत आहेत. अनेक महिने, वर्ष डेट केल्यानंतर काही सेलिब्रेटींनी विवाहाच्या घट्ट नात्यात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूडप्रमाणे कॉलीवूडमध्येही लगीनघाई सुरू असल्याचे चित्र आहे.
तामिळ चित्रपट दिग्दर्शक शंकर (Shankar) यांची मुलगी ऐश्वर्या शंकर (Aishwarya Shankar) हिचा तरुण कार्तिकसोबत (Tarun Karthik) साखरपुडा पार पडला आहे. सोशल मीडियावर या बातमीने धुमाकूळ घातला आहे. तरूण कार्तिक हा दिग्दर्शक शंकर यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता.
सोशल मीडिया मध्ये शेअर होत असलेल्या फोटोमध्ये ऐश्वर्या आणि तरुणची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. ऐश्वर्या साडीवर सोन्याचे दागिने परिधान केले आहेत. तरुण कार्तिकने पांढऱ्या रंगाचा आउटफिट परिधान केला होता. जोडपे त्यांच्या साखरपुड्यामध्ये खूपच सुंदर दिसत होते. चाहत्यांनी या जोडप्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
दिग्दर्शक शंकर यांनी 'इंडियन', 'बॉईज', 'शिवाजी द बॉस', 'आय', '2.0' (रोबोटचा सिक्वेल) आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तामिळ चित्रपटसृष्टीत वेगळे विषय हाताळण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे म्हटले जात आहे.
क्रिकेटपटू रोहितसोबत झाला होता ऐश्वर्या पहिला विवाह
ऐश्वर्याने यापूर्वी जून 2021 मध्ये क्रिकेटपटू रोहितसोबत लग्न केले होते आणि कोविड-19 महामारीच्या काळात शंकरने महाबलीपुरममधील एका लक्झरी रिसॉर्टमध्ये हा विवाह सोहळा आयोजित केला होता. पाहुण्यांच्या यादीत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यासह अनेक महत्त्वाच्या लोकांचा समावेश होता.
एका 16 वर्षीय मुलीने क्रिकेट प्रशिक्षक थमराय कन्नन यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात रोहितचेही नाव समोर आल्याने तो वादात अडकला होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
