एक्स्प्लोर

गोड बातमी! सना खानच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला, 'राजकुमार' घरी येताच खास पद्धतीने दिली खुशखबर!

बॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सना खानने दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. ही खुशखबर खुद्द तिनेच आपल्या इन्स्टाग्राम खात्यावरून दिली आहे.

मुंबई : बॉलिवुडमध्ये तुम्हाला रोज नवनवे चेहरे दिसतात. या बॉलिवुडमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक तरुण-तरुणी मुंबईची वाट धरतात. यामध्येच प्रसिद्ध अभिनेत्री सना खान हिचादेखील समावेश होते. या अभिनेत्रीने आपला काळ चांगलाच गाजवला होता. लग्न झाल्यानंतर मात्र या अभिनेत्रीने बॉलिवुडला रामराम ठोकत आनंदात वैवाहिक जीवन घालवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, याच सना खानच्या घरी एक खुशखबर आली आहे. या अभिनेत्रीच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला असून तिने गोड मुलाला जन्म दिला आहे. 

सना खानने दिला दुसऱ्या मुलाला जन्म

खुद्द सना खाननेच ही खुशखबर दिली आहे. आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर तिने याबाबत माहिती दिली आहे. तिने एक व्हिडीओ पोस्ट करून आमच्या घरी छोटा पाहुणा आल्याचं म्हटलं. विशेष म्हणजे सना खानने त्यांना मुलगा झाल्याचं सांगितलंय. ही खुशखबर देताना तिने आपला पती अनस सय्यदलाही टॅग केलं आहे. सना खान आणि अनस सय्यद दुसऱ्यांना आई-बाबा झाले आहेत. सोमवारी (6 जानेवारी) त्यांनी याबाबतची माहिती सार्वजनिक केली आहे. सनाला याआधीही मुलगाच झाला होता. आता ती दोन मुलांची आई झाली आहे. 

2020 मध्ये केलं लग्न

सनाने ही खुशखबर देताना समर्पक असे कॅप्शन दिले आहे. अल्लाहने प्रत्येकाच्या आयुष्यात सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. वेळ आल्यावर अल्लाह आपल्याला त्या गोष्टी देतो. विशेष म्हणजे अल्लाह नशिबात असलेल्या गोष्टी जेव्हा देतो तेव्हा आपली झोळी आनंदाने तो भरून टाकतो, असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय. तर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये आपल्या मुलाला तिने छोटा राजकुमार असं म्हटलंय. सना खान आणि अनस सय्यद यांनी 21 नोव्हेंबर 2020 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर 5 जुलै 2023 मध्ये तिने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. त्यांनी आपल्या या मुलाचे नाव तारीक जामील असे ठेवले. 

View this post on Instagram
 
A post shared by Saiyad Sana Khan (@sanakhaan21)

लग्नाआधी बॉलिवुडला अलविदा 

पहिल्या मुलाच्या जन्मानंतर लगेच नऊ महिन्यांनी सना खानने दुसऱ्यांदा गर्भवती असल्याचे जाहीर केले होते. इन्स्टाग्रावर व्हिडीओ पोस्ट करून तिने अल्लाहचे आभार मानले होते. दरम्यान, सना खान ही बीग बॉस सिझन 6 मध्ये झळकली होती. तेव्हापासून ती देशभरात प्रसिद्ध झाली होती. पुढे तिने सलमान खानच्या जय हो या चित्रपटातही काम केले होते. मात्र लग्नाच्या आधी तिने बॉलिवुडला रामराम ठोकला आणि नोव्हेंबर 2020 मध्ये लग्न केले.

हेही वाचा : 

एक खून...अनेक आरोपी..! स्वप्नील जोशीच्या 'जिलबी' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च, मर्डरमिस्ट्री पाहून तुम्हीही व्हाल थक्क  

गेल्या 30 वर्षांत कुणालाच जमलं नाही ते पुष्पा-2 ने करून दाखवलं, अल्लू अर्जुनच्या चित्रपटाची कमाई वाचून थक्क व्हाल!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिगचा अपमान
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, कलाप्रेमींचा अपमान
Market Yard: मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
Sanjay Raut : अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
Jalgaon Crime : जळगावातील 'त्या' हॉटेलमध्ये पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवला अन् वेश्या व्यवसायाचं बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
जळगावातील 'त्या' हॉटेलमध्ये पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवला अन् वेश्या व्यवसायाचं बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 11 AM 07 January 2025 सकाळी 11 च्या हेडलाईन्सSanjay Raut Delhi : अजित पवार हे अ‍ॅक्सिडेंटल नेते..संजय राऊत यांची सडकून टीका #abpmajha100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 7 Jan 2025ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 07 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिगचा अपमान
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, कलाप्रेमींचा अपमान
Market Yard: मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
Sanjay Raut : अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
Jalgaon Crime : जळगावातील 'त्या' हॉटेलमध्ये पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवला अन् वेश्या व्यवसायाचं बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
जळगावातील 'त्या' हॉटेलमध्ये पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवला अन् वेश्या व्यवसायाचं बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
आता राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलवर बंदी! वाघिणीसह 5 बछड्यांना घेरल्यानंतर हायकोर्टाची कठोर भूमिका
आता राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलवर बंदी! वाघिणीसह 5 बछड्यांना घेरल्यानंतर हायकोर्टाची कठोर भूमिका
सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
Mumbai Crime: अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा करत खुणावलं, नागरिकांनी रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली
अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा केला, रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली, गुन्हा दाखल
Santosh Deshmukh Case: कोयता, 41 इंचाचा रॉड, फायटर अन्... संतोष देशमुखांच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम
रॉड, फायटरने बेदम मारुनही संतोष देशमुखांचा जीव जात नव्हता, हैवान आरोपींनी छातीवर उड्या मारल्या
Embed widget