एक खून...अनेक आरोपी..! स्वप्नील जोशीच्या 'जिलबी' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च, मर्डरमिस्ट्री पाहून तुम्हीही व्हाल थक्क
स्वप्नील जोशी याचा जिलबी हा चित्रपट येत्या 17 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. त्याआधी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे.
मुंबई : स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) हे मराठी सिनेसृष्टीतील मोठे नाव आहे. त्याचा चित्रपट आला की तो बॉक्स ऑफिसवर कमाल करतोच. आतापर्यंत त्याने अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. दरम्यान, आता त्याचा जिलबी हा चित्रपट येत्या 17 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. हा ट्रेलर पाहून जिलबी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असे म्हटले जात आहे.
17 जानेवारी 2025 पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात
स्वप्नील जोशीने आपल्या सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला आहे. सोबतच त्याने एक अनोखे कॅप्शन दिले आहे. 'एक खून... अनेक आरोपी...रहस्याचा अविस्मरणीय गोड आणि गूढ थरार ! ‘जिलबी’ चित्रपट 17 जानेवारी 2025 पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!' असे स्वप्नील जोशीने कॅप्शनमध्ये म्हटलंय.
View this post on Instagram
चित्रपटाची कहाणी काय आहे?
स्वप्नील जोशीच्या नव्या चित्रपटाचे नाव जिलबी असे आहे. येत्या 17 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नितीन कांबळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. स्वप्नील जोशी या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत आहे. विशेष म्हणजे प्रसाद ओक यासारखे बडे अभिनेतेही या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात एका खुनातील मारेकऱ्यांचा शोध घेण्यात आला आहे. खु्न्याचा शोध घेताना स्वप्नील जोशीपुढे वेगवेगळी आव्हानं येताना दिसतायत. असे असताना तो मारेकऱ्याचा शोध कसा घेतो? हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
हेही वाचा :
सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा! कोण आहे ही भारताची 'हानिया आमीर', जिच्या अदांवर लाखो फिदा!
अशी चीनी अभिनेत्री जिच्या सौंदर्यापुढे अनेकजणी फिक्या, तिच्या 'या' पाच वेब सिरीज पाहिल्यात का?