एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आयुष्याच्या शेवटपर्यंत कुटुंबातील कुणीही काँग्रेस सोडणार नाही : शिवराज पाटील चाकूरकर
चाकूरकर यांच्या स्नूषा डॉ. अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा आणि लातूर शहर मधून भाजपची अमित देशमुख यांच्या विरोधात उमेदवारी घ्यावी असे जोरदार प्रयत्न भाजपाच्या गटाकडून सुरू होते. परंतु पाटील यांनी कॉंग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
लातूर : आपण मरेपर्यंत आपण किंवा आपले कुटुंबीय काँग्रेस सोडणार नाही, असे माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर स्पष्ट केलं आहे. भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांची मनधरणी करण्याचा काल दिवसभर प्रयत्न केला. चाकूरकर यांच्या स्नूषा डॉ. अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा आणि लातूर शहर मधून भाजपची अमित देशमुख यांच्या विरोधात उमेदवारी घ्यावी असे जोरदार प्रयत्न भाजपाच्या गटाकडून सुरू होते. परंतु पाटील यांनी कॉंग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
याशिवाय आज काँग्रेस उमेदवारांच्या उमेदवारी दाखल करण्यासाठी शिवराज पाटील कालच लातूरमध्ये दाखल झाले. आज त्यांच्या उपस्थितीत लातूर शहर लातूर ग्रामीण आणि औसा मतदारसंघांमध्ये काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.
एबीपी माझाशी बोलताना शिवराज पाटील चाकूरकर यांनी काँग्रेसची विचारधारा हाच आपला श्वास आहे. त्यामुळे कुटुंबातला कोणताही सदस्य आपल्या हयातीत इतर पक्षात जाणार नाही. पक्षनिष्ठा आणि विचारनिष्ठा आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहिल, असे त्यांनी म्हटले आहे. आयुष्याच्या शेवटपर्यंत कुटुंबातील कुणीही काँग्रेस सोडणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
लातूरमध्ये अमित देशमुख यांच्या विरोधामध्ये चांगल्या उमेदवारांच्या शोधात भाजप आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टीने काँग्रेसचे दिग्गज नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील यांना गळ घातली होती. अर्चना पाटील यांनी भाजपची उमेदवारी घेतली तर काँग्रेसच्या दोन दिग्गज कुटुंबामध्येच लातूर शहरामध्ये रंजक लढत पाहायला मिळू शकली असती. मात्र आता शिवराज पाटील चाकूरकर यांच्या नकारामुळेच अर्चना पाटील यांच्या भाजप पक्ष प्रवेशाला पूर्णविराम लागला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
करमणूक
निवडणूक
Advertisement