एक्स्प्लोर
राधाकृष्ण विखे पाटलांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा काँग्रेस हायकमांडकडे सोपवला!
राधकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी गेल्याच आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता.

मुंबई/नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा हायकमांडकडे सोपवला आहे. मात्र काँग्रेस हायकमांडकडून विखे पाटील यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यांच्या राजीनाम्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असं सांगण्यात येत आहे.
राधकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी गेल्याच आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. विरोध पक्षनेत्याच्या मुलानेच भाजपमध्ये प्रवेश केल्याने वडील राधाकृष्ण विखेंवर पक्षातूनच प्रश्न उपस्थित झाले होते. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका जाहीर केली होती. पक्षाने अविश्वास दाखवल्यास विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असं विधान त्यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगरची जागा सोडण्यास नकार दिल्याने सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु विरोधी पक्षनेत्याच्या मुलानेच निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही काँग्रेससाठी नैतिक मनोबल खच्चीकरण करणारी होती.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून यासंदर्भातील घडामोडी दिल्लीत सुरु होत्या. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नाराज होते. त्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांना काँग्रेस अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. योग्य वेळी राजीनाम्यावर निर्णय घेतला जाईल, असं सांगण्यात येत आहे. हायकमांड त्यांच्याबाबत मवाळ राहिलेलं नाही. विरोधी पक्षनेतेपदाच्या बाबतीत त्यांच्यावर थेट कारवाई होऊ शकते.
VIDEO | राधाकृष्ण विखे पाटलांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा हायकमांडकडे सोपवला
संबंधित बातम्या
....म्हणून नगरमध्ये कोणाचाच प्रचार करणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा?
काँग्रेसला धक्का, सुजय विखे पाटील यांचा भाजपात प्रवेश
अंतर्मनाचा आवाज ऐकून पुढची भूमिका ठरवावी लागेल, विखे पाटलांचा गर्भित इशारा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
