Punjab Result AAP : लाडूसाठी ऑर्डर, सेलिब्रेशन सुरु, पंजाबमध्ये 'आप' धुरळा उडवणार?
Punjab Result AAP : एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये यंदा आम आमदी पक्षाचे पारडे जड दिसत आहे. त्यामुळे यंदा पंजाबमध्ये आपचं सरकार उभं राहु शकतं.
Punjab Result AAP : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली असून आता सर्वांचं लक्ष निकालाकडे लागून आहे. कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार आणि कुठला पक्ष सरकार स्थापन करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यात देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या पंजाबमध्ये कोणाचं सरकार येणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे. दरम्यान एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये आपला सर्वाधिक मतं मिळणार असं समोर आलं आहे. त्यामुळे तेथील आप कार्यकर्त्यांनी चक्क लाडू तयार करण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी भटींडा येथील आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात लाडू तयार करायला सुरुवात केली आहे. वार्ड नंबर 24 चे आपचे कार्यकर्ते अशोक कुमार बन्सल यांच्यामते त्यांचा उमेदवार जवळपास जिंकलाच आहे, ज्यामुळे आम्ही लाडू बनवण्यास सुरुवात केली आहे. लुधियाना येथील आप कार्यकर्त्यांनी देखील लाडूची ऑर्डर दिली असून 5 किलो लाडू तयार केल्याचं ही त्यांनी सांगितलं.
एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे सरकार येऊ शकते. पंजाबमध्ये आपला 39.1 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर आप पक्षाला 51 ते 61 जागा मिळू शकतात. एबीपी माझा आणि सी वोटर यांच्याकडून सर्व्हे घेण्यात आला आहे. त्यानुसार, पंजाबमध्ये केजरीवाल यांच्या आप पक्षाचे सरकार येण्याची शक्यता आहे. पण पंजाबमध्ये कुणाची सत्ता येणार हे 10 मार्च रोजी समजणार आहे.
कोणत्या पक्षाला मिळणार किती टक्के मते?
कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा?
पंजाबमध्ये 65.32 टक्के मतदान –
117 विधानसभा जागांसाठी पंजाबमध्ये एकाच टप्प्यात मतदान पार पडले. मतदारांनी समिश्र प्रतिसाद दर्शवला. पंजाबमध्ये 65.32 टक्के मतदान झाले होते. पंजाबमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रचार केला होता.
हे ही वाचा-
- Election Result 2022 Live : निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर 'असा' पाहा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
- Election Results 2022: निकालाचा काऊंटडाऊन सुरु, मॅजिक फिगर गाठण्यासाठी धडपड, पाहा कोणत्या राज्यात किती जागा?
- ABP Cvoter Exit Poll : पंजाबचा कौल आप पक्षाला, पाहा कुणाला मिळू शकतात किती जागा?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha