Election Result 2022 Live : निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर 'असा' पाहा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे बहुप्रतिक्षित निकाल एबीपी माझा वेबसाईटवर (https://marathi.abplive.com/ ) आणि एबीपी माझा लाईव्ह टीव्हीवर (https://marathi.abplive.com/live-tv) सकाळी 8 वाजल्यापासून पाहता येणार आहे.
![Election Result 2022 Live : निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर 'असा' पाहा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल Election Result 2022 Live Streaming How To Watch Five State Assembly Poll Result On ECI Results.eci.gov.in Election Result 2022 Live : निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर 'असा' पाहा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/09/415ada1b841717c150b34347f0fd7f8c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Election Results Live Streaming : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल (election 2022 Result) उद्या (गुरुवारी) जाहीर होणार आहेत. भारतीय निवडणूक (election) आयोगाकडून उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे बहुप्रतिक्षित निकाल जाहीर करणार आहे. पाचही राज्यांतील मतमोजणी 10 मार्च रोजी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. एक्झिट पोलमधून उत्तराखंड आणि गोव्यात चुरशीच्या शर्यत पाहायला मिळणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर बहुतेकांनी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या विजयाचा अंदाज व्यक्त केला आहे आणि यूपी आणि मणिपूरमध्ये भाजप विजयी होण्याची शक्यता आहे. एबीपी माझा आणि एबीपी माझा लाईव्ह टीव्हीवर सकाळी 8 वाजल्यापासून तुम्ही निवडणूक निकालांचे लाईव्ह अपडेट्स पाहू शकता.
उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत सात टप्प्यांत मतदान झालं आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीला तर मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला मतदान झालं. ज्यामध्ये सर्वाधिक जागा यूपी (UP) (403 जागा) त्यानंतर पंजाब (Punjab) (117 जागा), उत्तराखंड (Uttrakhand) (70 जागा), मणिपूर (Manipur) (60 जागा) आणि गोवा (Goa) (40 जागा) आहेत.
पाच राज्यांतील सर्व 690 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांचे अचूक निकाल पाहण्यासाठी, भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) results.eci.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन करून निकाल पाहता येणार आहे. निवडणुकांचे निकालाचे लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
ECI वेबसाईट आणि अॅपवर विधानसभा निवडणुकांचे निकाल कसा पाहणार? (Step-By-Step Guide To Check Assembly Election Results On ECI Website And App)
- सर्वप्रथम, भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइट https://results.eci.gov.in/ ला भेट द्या
- 'विधानसभा मतदारसंघाच्या मार्च 2022 च्या सार्वत्रिक निवडणुका' लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा. (10 मार्च 2022 रोजी सकाळी 8 वाजता निकालांचा ट्रेंड सुरू होईल)
EC अॅपवर निवडणूक निकाल कसा पाहाल? (Steps To Check Election Results On EC App)
- Google Play Store किंवा Apple App Store ला भेट द्या आणि मतदार हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा. नोंदणीसाठी तुमचं क्रेडेन्शियल्स टाईप करा तुम्ही एबीपी माझा अॅप आणि वेबसाईटवरही निकाल पाहू शकता
- https://www.abplive.com/live-tv या लिंकवर क्लिक करून तुम्ही APB माझाचे लाईव्ह स्ट्रीमिंग देखील पाहू शकता. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या प्रत्येक जागेवर संपूर्ण कव्हरेजसाठी आमच्या वेबसाइटवर पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)