एक्स्प्लोर

ABP Cvoter Exit Poll : पंजाबचा कौल आप पक्षाला, पाहा कुणाला मिळू शकतात किती जागा?

Punjab Exit Poll : पंजाबमध्ये आप पक्षाचे पारडे जड मानले जात आहे. एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये आपची सत्ता येऊ शकते.

ABP Cvoter Exit Poll : एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे सरकार येऊ शकते. पंजाबमध्ये आपला 39.1 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर आप पक्षाला 51 ते 61 जागा मिळू शकतात.  एबीपी माझा आणि सी वोटर यांच्याकडून सर्व्हे घेण्यात आला आहे. त्यानुसार, पंजाबमध्ये केजरीवाल यांच्या आप पक्षाचे सरकार येण्याची शक्यता आहे. पण पंजाबमध्ये कुणाची सत्ता येणार हे 10 मार्च रोजी समजणार आहे.

कोणत्या पक्षाला मिळणार किती टक्के मते?

ABP Cvoter Exit Poll : पंजाबचा कौल आप पक्षाला, पाहा कुणाला मिळू शकतात किती जागा?

कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा?
ABP Cvoter Exit Poll : पंजाबचा कौल आप पक्षाला, पाहा कुणाला मिळू शकतात किती जागा?

पंजाबमध्ये 65.32 टक्के मतदान –
117 विधानसभा जागांसाठी पंजाबमध्ये एकाच टप्प्यात मतदान पार पडले. मतदारांनी समिश्र प्रतिसाद दर्शवला. पंजाबमध्ये 65.32 टक्के मतदान झाले होते. पंजाबमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रचार केला होता.

10 मार्च रोजी होणार फैसला!
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाल. उत्तर प्रदेशमधील सातव्या टप्प्याचे मतदान आज पूर्ण झाले. पाचही राज्याचा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी मिळणार आहे. 10 मार्च रोजी पंजाबमध्ये कुणाची सत्ता येणार हे समजणार आहे.

पंजाब निवडणुकांमधील गाजलेले मुद्दे
शेतकरी आंदोलनातील पंजाब
पंजाब काँग्रेसमधला अंतर्गत वाद
कॅ.अमरिंदर सिंह यांचा राजीनामा
अंमली पदार्थांचं सावट
पंतप्रधान मोदी दौरा सुरक्षा प्रश्न

2017 मध्ये कुणाला किती मिळाल्या होत्या जागा? - 
2017 च्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती. 117 जागापैकी काँग्रेसने 77 जागावर विजय मिळवला होता. तर अकाली दल 15, भाजप 3 आणि आम आदमी पार्टीला 20 जागांवर विजय मिळाला होता. तर दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली होती. 

एक्झिट पोल मेथॉडोलॉजी काय?

सध्याच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आणि अंदाज C-Voter एक्झिट पोल/पोस्ट पोल मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या दिवसानंतर राज्यभरातील 18 वर्षावरील व्यक्तींच्या मुलाखतींवर आधारित आहेत. सर्व मतदारांनी दिलेले तपशील, माहिती, अंदाज त्या दिवसावर आधारीत आहेत. राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात डेटा जमा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही वेळेस ही संख्या 100 च्या प्रमाणात नाही. आमचा अंतिम डेटा हा राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणातील सामाजिक-आर्थिक स्तराच्या  +/- 1%  प्रमाणात आहे. आम्ही संभाव्य निकालाच्या अगदी सर्वात जवळचा अंदाज वर्तवू शकतो असा आमचा विश्वास आहे.

या सर्वेंसाठी सर्व विधानसभा मतदारसंघातील नमुने घेण्यात आले आहेत. MoE मॅक्रो स्तरावर +/- 3% आणि सूक्ष्म स्तरावर +/- 5%  इतके आहे.

विश्लेषणासाठी आम्ही आमच्या अल्गोरिदमचा वापर केला आहे. प्रांतीय आणि विभागीतय मतांचे विश्लेषण करण्यासाठी Split-Voter  घटकाचा वापर केला आहे. याच घटकाचा वापर मतदानाची टक्केवारी, जागा किती मिळू शकतात, याचा अंदाज वर्तवण्यासाठी केला आहे. मिळणार असलेल्या मतांच्या टक्केवारीचा अंदाज आणि मिळणाऱ्या अंदाजित जागा यासाठी अंकगणिताचा शास्त्रीय वापर करण्यात आला आहे. संभाव्य मिळणाऱ्या जागांचा अंदाज वर्तवणे हा सर्वेक्षण विज्ञानाचा भाग नाहीत.

सी वोटर एक्झिट पोलसाठीचा डेटा हा मतदान केल्यानंतर मतदारांकडून घेतला जातो. निवडणूक संपेपर्यंत ही प्रक्रिया सुरू असते. एकाच राज्यासाठी ही मुलाखती घेतल्या जातात. यासाठी सर्व विधानसभा मतदारसंघात यादृच्छिकपणे मतदान केंद्र निवडले जातात. अंदाज योग्य पद्धतीने वर्तवण्यासाठी आम्ही अल्गोरिदम प्रक्रियेचा वापर केला आहे.

सर्वेक्षणासाठी आम्ही यादृच्छिकपणे डेटा जमा केला आहे. जणगणनेनुसार असलेल्या स्थानिक लोकसंख्या, त्यातील वैविध्य आदींचा विचार करण्यात आला आहे. आम्ही  WAPOR कोडचा (World Association of Public Opinion Research) वापर केला आहे. असोसिएशन ऑफ पब्लिक ओपिनियन रिसर्च आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्वे ही आम्ही SOP म्हणून मान्य केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Embed widget