एक्स्प्लोर

Sharad Pawar : 40 टक्के भानगड काय आहे हे कळेना, कर्नाटकची इतकी बदनामी कुणीही केली नाही; प्रचार संपताना शरद पवारांचा भाजपवर शेवटचा 'वार'

Karnataka Election 2023 : निपाणीतून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून द्या, इथल्या उसाला दर वाढवून देण्याबाबत मार्गदर्शन करू असं आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं. 

बेळगाव: कर्नाटकात 40 टक्क्यांचं सरकार आहे असं म्हटलं जातं, ही 40 टक्के भानगड काय असते हे काही कळेना अशी जहरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर केली आहे. मणिपूरसारखं लहान राज्य भाजप सरकारला सांभाळता येईना असंही ते म्हणाले. बेळगाव जिल्ह्यातल्या निपाणी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवारांनी भाजपवर चांगलीच टीका केली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी आज प्रचार संपला असून 10 मे रोजी मतदान होणार आहे. 

निपाणी या ठिकाणी आयोजित सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की कर्नाटकात जाऊन शेतकऱ्यांचे, तरुणांचे, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या निवडणुकीत उतरायचं. त्यानंतर आम्ही या ठिकाणी उमेदवार दिले. उत्तम पाटील यांना निपाणीमधून संधी दिली. 

निवडणुकीत चावी देणारे लोक खूप असतात, पण कुठं थांबायचं हे कळलं नाही की अपघात होतो असा टोला शरद पवारांनी काँग्रेसचे उमेदवार काका पाटील यांना लगावला. 

शरद पवार पुढे म्हणाले की, धनाचा वापर करून माणसं फोडून सरकार बनवली जातात, त्याला कर्नाटक देखील अपवाद नाही. अशा पैशाचा वापर करून सरकार बनवणाऱ्यांना बाजूला ठेवलं पाहिजे. ही 40 टक्के काय भानगड आहे हे कळेना. कर्नाटकची आजवर इतकी बदनामी कुणीही केली नाही जितकी भाजप सरकारने केली आहे. मिळालेली सत्ता सामान्य माणसासाठी वापरायची असते. पण तसं कर्नाटकात झाल्याचं दिसत नाही. 

मणिपूरमध्ये गेले 6 दिवस संघर्ष सुरू आहे, अनेक विद्यार्थी मृत्युमुखी पडले सांगत शरद पवार म्हणाले की, ज्यांच्या हातात देश आहे त्यांना मणिपूर सारखं राज्य सांभाळता येत नाही. मणिपूर कसं वाचवता येईल यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करा. शरद पवार म्हणाले की, 14 एप्रिल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे, इथले काही लोक त्याला अशुभ दिवस म्हणत आहेत. 

शरद पवार म्हणाले की, माझ्याकडे 10 वर्षे कृषी खातं होतं, 72 हजार कोटी कर्जमाफी केली, व्याजाचे दर 3 टक्क्यांवर आले. उत्तम पाटील यांना निवडून द्या, इथल्या उसाला दर वाढवून देण्याबाबत मार्गदर्शन करू. 

दरम्यान, कर्नाटकातील निवडणुकीचा प्रचार आज संपला असून 10 मे रोजी मतदारांचा कौल मतपेटीत बंद होणार आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Embed widget