Jayant Patil on Devendra Fadnavis: भाजपने तुम्हाला फौजदारचा हवालदार केला, तुम्ही आमची माप काढावी का? जयंत पाटलांचा फडणवीसांवर बोचरा वार
Jayant Patil on Devendra Fadnavis: शरद पवार यांच्या झंझावातात 2024 लाख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष होणार असल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले.
Jayant Patil on Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष, कर्नाटकात काय डोंबल करणार? हे पार्सल महाराष्ट्रात पाठवा त्याचे काय करायचे ते पाहतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निपाणीमध्ये जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. या टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने निपाणीमध्येच जाहीर सभा घेत या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या शैलीमध्ये फडणवीसांवर हल्लाबोल करताना जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावेळी बोलताना म्हणाले की, या देशात हुकूमशाही वाढत चालली आहे. विरोधात बोलणाऱ्यांना गप्प बसवण्याचं काम सुरू आहे. कर्नाटकात धर्मनिरपेक्ष विचारांचे सरकार यावं अशीच आमची इच्छ आहे. आमचे चार ते पाच आमदार निवडून येतील. यावर्षी कर्नाटक राज्यात भाजप सरकार येणार नाही.
पक्षाने तुम्हाला फौजदाराचा हवालदार केला
जयंत पाटील पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस हा साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाने तुम्हाला फौजदाराचा हवालदार केला आहे आणि तुम्ही आमची मापं काढावी का? शरद पवार यांच्या झंझावातात 2024 लाख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष होणार असल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की कर्नाटकात जाऊन शेतकऱ्यांचे, तरुणांचे, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या निवडणुकीत उतरायचं
धनाचा वापर करून माणसं फोडून सरकार बनवली जातात
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मणिपूरमध्ये गेले 6 दिवस संघर्ष सुरू आहे, अनेक विद्यार्थी मृत्युमुखी पडले. ज्यांच्या हातात देश आहे त्यांना मणिपूर सारखं राज्य सांभाळता येत नाही. मणिपूर कसा वाचवता येतील यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. धनाचा वापर करून माणसं फोडून सरकार बनवली जातात त्याला कर्नाटक देखील अपवाद नाही. अशा पैशाचा वापर करून सरकार बनवणाऱ्यांना बाजूला ठेवलं पाहिजे. 40 टक्के काय भानगड आहे कळेना, कर्नाटकची इतकी बदनामी कुणीही केली नाही. मिळालेली सत्ता सामान्य माणसासाठी वापरायची असते. 14 एप्रिल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे, तो सुद्धा येथील काही लोक अशुभ दिवस म्हणत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की कर्नाटकात जाऊन शेतकऱ्यांचे, तरुणांचे, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या निवडणुकीत उतरायचं, असेही पवार यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या