एक्स्प्लोर
धनूदादा अशी हाक आता कानावर पडत नाही, धनंजय मुंडेंचं भावूक विधान
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना बहीण पंकजा मुंडे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना "धनूदादा अशी हाक आता कानावर पडत नाही", असं भावूक विधान त्यांनी केलं.
मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे या बहीण-भावामधलं राजकीय वैर सगळ्यांनाच परिचित आहे. मात्र धनंजय मुंडे यांना बहीण पंकजा मुंडे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना "धनूदादा अशी हाक आता कानावर पडत नाही", असं भावूक विधान त्यांनी केलं. एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात ते बोलत होते.
पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या नात्याबद्दल बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, "राजकारणात येण्यापूर्वीचं माझं आणि बहिणीच नातं मला आवडतं. राजकारणात आल्यानंतर आमच्यात जे अंतर पडत गेलं ते व्हायला नको होतं. इतक्या वर्षात आता या नात्यात अंतर पडलं आहे. मला त्यांनी धनुदादा म्हणून हाक मारणं आता कानावर पडत नाही".
तसेच दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलही त्यांनी मनमोकळं केलं. "माझं आणि माझ्या काकांचं नातं मी विसरू शकत नाही. पुढचा जन्म वगैरे हे काही मला मान्य नाही पण तसं जर असेल तर पुढच्या जन्मी माझा त्याच घरात जन्म व्हावा आणि मला तेच काका मिळावेत असं वाटण्याइतक आमचं नातं आधी चांगलं होतं", असं मुंडे म्हणाले.
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
कोल्हापूर
नांदेड
महाराष्ट्र
Advertisement