एक्स्प्लोर

Mahim Vidhan Sabha Result 2024: माहीम विधानसभेतील दारुण पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे यांचा पराभव, ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बहुप्रतिक्षीत निकाल शनिवारी जाहीर झाला. यामध्ये भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गटाचा समावेश असलेला महायुतीला प्रचंड मोठे यश मिळाले. महायुतीने राज्यातील 288 मतदारसंघांपैकी तब्बल 232 मतदारसंघांमध्ये विजय पक्का केला आहे. तर महाविकास आघाडीला  अवघ्या 52 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर अपक्षांना 4 जागांवर विजय मिळाला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मुंबईतही मोठे यश मिळाले. मुंबईतील सर्वाधिक लक्षवेधी लढत असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला होता. अमित ठाकरे यांच्याविरुद्ध शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत यांचे आव्हान होते. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून अमित ठाकरे यांना पोस्टल मतमोजणी वगळता आघाडी घेता आली नाही. महेश सावंत आणि सदा सरवणकर यांच्यातच शेवटपर्यंत चुरस होती. अखेर या लढतीत महेश सावंत यांनी बाजी मारली. 

अमित ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं?

माहिम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे. आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो, असे अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.  गेली अनेक वर्षे या प्रभागातील अगदीच बेसिक गरजांसाठी लोकांचा संघर्ष बघितला. याच संघर्षातून उभ्या राहिलेल्या विचारांनी, प्रभागाच्या विकासासाठी आणि बदलासाठी आपण एक नवा अध्याय लिहावा, केवळ या हेतूने मी या निवडणुकीत उतरलो होतो. मात्र, कदाचित येथील जनतेच्या मनात काही वेगळे असावे. हा कौल मला हेच शिकवतोय की, अजून खूप काम करायचं आहे. अजून मेहनत घ्यायची आहे. अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आपला विश्वास मिळवण्यासाठी अजून झटायचं आहे. माझी ही लढाई कधीच राजकीय सत्ता मिळवण्यासाठी नव्हती. कारण ही लढाई कोणा राजपुत्राची नसून, ती होती एका सामान्य कार्यकर्त्याची - जो सर्वांसाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतो. मला फक्त आपल्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणायचं होतं.

आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; एक नवी सुरुवात आहे. तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी, माहिम, दादर, प्रभादेवी आणि सबंध महाराष्ट्राच्या विकासासाठी, मी 24 तास झटत राहीन, हा माझा शब्द आहे. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला मतदान केलं, त्यांचे मनापासून आभार. तुमचा विश्वास वाया जाणार नाही.

मी वचन देतो - तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन… कारण माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रितपणे नक्की जिंकू!

आपलाच,
अमित ठाकरे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्याAjit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
Embed widget