एक्स्प्लोर

मोठी बातमी! सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम; लेकासाठी बाप मैदानात, राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार

शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर हे माहिम विधानसभा (Mahim Assembly) मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. उद्या ठरल्याप्रमाणे ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.  

Sada Saravankar : शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर हे माहिम विधानसभा (Mahim Assembly) मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. संध्याकाळी सदा सरवणकर (Sada Saravankar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर देखील सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. उद्या ठरल्याप्रमाणे ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.  

राज ठाकरे रात्री 11 ते 11:30 वाजता मुख्यमंत्र्यांची भेच घेणार 

माहिम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मैदानात आहेत. त्यांचा शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचा सामना होणार आहे.  दरम्यान, राज ठाकरे रात्री 11 ते 11:30 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. यावेळी माहीम विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा होणार आहे.

मनसे-शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकीय शीतयुद्ध सुरू

विधानसभा निवडणुकांसाठी मुंबईतील वरळीनंतर आता माहीम विधानसभा मतदारसंघ सर्वात लक्षवेधी ठरला आहे. कारण, येथील मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकांच्या रणांगणात उतरले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेविरुद्ध महायुतीकडून विधानसभेला उमेदवार देण्यात आला आहे. माहीम मतदारसंघात शिवसेना उमेदवार सदा सरवणकर हे अमित ठाकरे  निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे, मनसे-शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकीय शीतयुद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, शिवसेना महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर ह्यांनी पडत्या काळात आपली साथ दिल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. तर, अमित ठाकरे हे आपल्याच घरातील मुलगा असल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटंलय. या चर्चेदरम्यान, आता सदा सरवणकर यांनी थेट वर्षा बंगला गाठला होता. त्यामुळं माहीमबाबात काहीतरी मोठा निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, सदा सरवणकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

अमित ठाकरेंच्या उमेदवारीबाबत सदा सरवणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना आपली भूमिका मांडली होती. सदा सरवणकर म्हणाले, आशिष शेलार आणि राज साहेबांची एक चांगली मैत्री आहे. आता मैत्रीसाठी त्यांनी जर काहीतरी स्वतंत्र बोलले असतील तर तो त्यांचा भाग आहे. मी सोमवारी जाऊन अर्ज भरणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती.

महत्वाच्या बातम्या:

सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VBA Candidate List : वंचित बहुजन आघाडीची आठवी यादी जाहीर, किती जणांना संधी; अमित ठाकरे, रोहित पाटलांविरुद्ध उमेदवार जाहीर
वंचितची विधानसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर, अमित ठाकरे, रोहित पाटील यांच्या विरोधात उमेदवार
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 28 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 28 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBandra Railway Accident Special Report : प्रवाशांची गर्दी,चेंगरा-चेंगरी  वांद्रे स्टेशनवर काय घडलं?ABP Majha Headlines : 11 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VBA Candidate List : वंचित बहुजन आघाडीची आठवी यादी जाहीर, किती जणांना संधी; अमित ठाकरे, रोहित पाटलांविरुद्ध उमेदवार जाहीर
वंचितची विधानसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर, अमित ठाकरे, रोहित पाटील यांच्या विरोधात उमेदवार
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
Embed widget