(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा दावेदार पिछाडीवर, संगमनेरमध्ये धक्कादायक निकाल येणार?
विधानसभा निवडणुकीसाठी सध्या मतमोजणी चालू आहे. या निवडणुकीत संगमनेर हा मतदारसंघ चांगलाच चर्चात आहे. या जागेवरून बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत.
मुंबई : विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024 Result) मतमोजणी होत आहे. दुपारपर्यंत कोणाचे सरकार येणार, हे स्पष्ट होणार आहे. त्याआधी राज्यात चर्चेत असलेल्या मतदारसंघात नेमकी काय स्थिती आहे, असे विचारले जात आहे. राज्याच्या राजकारणात संगमनेर हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. येथून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून आता धक्कादायक कल समोर येत आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत.
मुख्यमंत्रिपदाचे दावेदार पिछाडीवर
संगमनेर या मतदारसंघातून बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर आहेत. थोरात हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. महाराष्ट्रात त्यांना काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या पंक्तित स्थान दिले जाते. याच कारणामुळे राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळालेच तर बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्रिपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक मानले जात आहेत. मात्र मतमोजणीच्या पहिल्याच कलात बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर गेले आहेत.
अमोल खताळ आघाडीवर
बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने अमोल खताळ यांना तिकीट दिलेले आहे. ते महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांनी मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात बाळासाहेब थोरात यांना मागे टाकले आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
अद्याप मतमोजणी बाकी, नेमके काय होणार?
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत अनेक मतदारसंघात पहिल्या फेरीची मतमोजणी चालू आहे. त्यामुळे समोर आलेले आकडे हे अगदीच सुरुवातीचे कल आहेत. त्यामुळे आगामी फेऱ्यांत चित्र बदलू शकते. सध्या बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर आहेत. मात्र पुढच्या काही तासांत ते आघाडी घेणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
आतापर्यंतचा निकाल काय सांगतोय?
राज्यभरात सध्या मतमोजणी चालू आहे. मात्र सध्याच्या कलानुसार राज्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. येथे भाजपाला 125 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 56 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 36 जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सध्याच्या मतमोजणीनुसार काँग्रेसला फक्त 20 मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे यांच्या पक्षाला 19 तर शरद पवारांच्या पक्षाला 18 जागा मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
Maharashtra Election Result 2024: मोठी बातमी: माहीम विधानसभेतून अमित ठाकरे आघाडीवर, मनसे सुस्साट!