फडणवीसांचा चेहरा पुढे केल्यास 5 ते 7 टक्के मतं कमी होतील, अमित शाहांना त्यांनाच मुख्यमंत्री करायचंय : रोहित पवार
Rohit Pawar on Devendra Fadnavis, करमाळा : आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
Rohit Pawar on Devendra Fadnavis, करमाळा : "देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढे केल्यास पाच ते सात टक्के मते कमी होतील. अमित शाह यांचा या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा डाव असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता बस झालं असं सांगण्यात येत आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या जागा कमी आणून भाजपला स्वत:च्या जागा वाढवायच्या आहेत. भाजपला शिंदे यांच्या जागा कमी करायच्या आहेत. या सर्वाचा फायदा महाविकास आघाडीला होईल" असा दावा आमदार रोहित पवार यांनी करमाळा येथे बोलताना केला.
रोहित पवार म्हणाले, बारामतीमध्ये पवार साहेब आणि सुप्रिया सुळे या स्वतः लक्ष घालत असल्याने येथून युगेंद्र पवार विजय होतील. सध्या महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी अनेक उमेदवार झाल्याने आज आणि उद्या पर्यंत सर्व वरिष्ठ नेते ही बंडखोरी कमी करतील. एका ठिकाणी एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न करतील. यंदा प्रत्येकाला महाविकास आघाडी जिंकवणार असल्याची खात्री असल्याने जास्तीत जास्त उमेदवारांनी महाविकास आघाडीतून उमेदवारी दाखल केल्याचेही रोहित पवार यांनी सांगितलं.
वारकऱ्यांवर लाठी चार्ज करणारे फडणवीस हे जनरल डायर आहेत
देवेंद्र फडणवीस हे स्वतःला अभिमन्यू असल्याचे दाखवत आहेत. स्वतःच व्हिडिओ करून सगळ्यांना आपण अभिमन्यू असल्याचे सांगत आहेत. मात्र गोरगरीब महिला आणि मुलांवर लाठी चार्ज करणारे वारकऱ्यांवर लाठी चार्ज करणारे फडणवीस हे जनरल डायर आहेत, असा घणाघात रोहित पवारांनी केला. महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला महागाई बेरोजगारी गुन्हेगारी अशा चक्रव्यूहमध्ये त्यांनी अडकवल्याने जनता त्रासून गेली आहे. जनतेला चक्रव्यूहामध्ये नेणारे हे अभिमन्यू आहेत, असा टोलाही रोहित पवार यांना फडणवीसांना लगावला.
महाविकास आघाडीच्या 170 ते 180 जागा येतील
मनोज जरांगे पाटील उमेदवार उभे करणार यावर बोलताना ते सामाजिक कार्यकर्ते असून तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. इतर पक्षाबाबत आम्ही बोललो असतो. मात्र सामाजिक कार्यकर्त्यावर आम्ही काही बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. सिंचन घोटाळ्यात फडणवीस आणि अजित पवार यांना अडचणीत आणले होते. भाजपच पक्ष आणि घर फोडण्यास कारणीभूत आहे. सिंचन घोटाळा प्रकरणी 2014 आणि 2019 ला याच मुद्द्याचा जोरदार वापर करून ते सत्तेत जेव्हा जेव्हा भाजप सत्तेत येतं तेव्हा तेव्हा महाराष्ट्राची वाट लागते. यावेळी महाविकास आघाडीच्या 170 ते 180 जागा येतील असा दावाही रोहित पवार यांनी केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या