एक्स्प्लोर

Shivdeep Lande Bihar Election Result 2025: महाराष्ट्राचे सुपुत्र, बिहारचा सिंघम शिवदीप लांडेंचं काय होणार? बिहारच्या कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतायत?

Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र शिवदीप लांडे जमालपूर मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.

Shivdeep Lande Bihar Election Result 2025: बिहारमध्ये आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे सिंघम अशी ओळख निर्माण केलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे यंदा बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Vidhansabha Election 2025) आपले नशीब आजमावत आहेत. शिवदीप लांडे (Shivdeep Lande) हे बिहारच्या जमालपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर इंडियन इनक्लूझिव्ह पार्टीच्या (IIP) नरेंद्र कुमार तांती आणि जदयूच्या नचिकेता मंडल यांचे आव्हान आहे. शिवदीप लांडे यांनी निवडणुकीपूर्वी हिंद सेना पक्षाची स्थापना केली होती. मात्र, ते या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत. आज बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. त्यामुळे शिवदीप लांडे हे जमालपूर मतदारसंघातून विजयी होणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

बिहार पोलीस दलात 18 वर्षे काम केल्यानंतर शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांनी हा निर्णय घेतला होता. शिवदीप लांडे हे राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले शिवदीप लांडे हे सध्या बिहारच्या स्पेशल टास्क फोर्समध्ये अधीक्षक होते. त्यांच्या बेधडक कामाच्या पद्धतीमुळे ते बिहारच्या जनमानसात प्रचंड लोकप्रिय आहेत. मध्यंतरी त्यांनी  मुंबईत अमली पदार्थ विरोधी कक्षातही काम केले होते. तेव्हाही  शिवदीप लांडे यांनी ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले होते. तर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त असताना अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणले होते. राज्यात गाजलेल्या मनसुख हिरण हत्याप्रकरणाच्या तपासातही शिवदीप लांडे यांचा समावेश होता.

निवडणुकीच्या शपथपत्रात नमूद केल्यानुसार, शिवदीप लांडे यांच्या बँक खात्यात 20 लाख 33 हजार रुपये आणि विविध ठिकाणी केलेली गुंतवणूक 6.65 कोटींच्या घरात आहे. लांडे यांच्यावर अडीच कोटींचे गृहकर्ज आहे. याशिवाय, त्यांच्याकडे 20 लाखांची एक कार आहे. शिवदीप लांडे यांच्या पत्नीकडे 100 ग्रॅम सोने असून त्या व्यावसायिक असल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. शिवदीप लांडे यांनी बिहार पोलिसांच्या सेवेत असताना उल्लेखनीय काम केले होते. ते 2009 मध्ये मुंगेरमध्ये एएसपी म्हणून रुजू झाले होते आणि 2011 पर्यंत तिथेच काम केले. तीन वर्षांत मुंगेर मधील गुन्हेगारी संपवण्यावर भर दिला. यामुळे मुंगेरमध्ये शिवदीप लांडे यांना मानणारा मोठा तरुण वर्ग आहे. या भागात त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे. त्यामुळेच त्यांनी बिहार आपली कर्मभूमी असल्याचे सांगत येथून विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता.

आणखी वाचा

IPS Shivdeep Lande Resigns : बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!

बिहार निवडणुकीचा आज निकाल; नितीश कुमार की तेजस्वी यादव, कोण होणार बिहारचा बाहुबली?, 243 जागांसाठी आज मतमोजणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Illegal Bike Taxi : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट
Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Illegal Bike Taxi : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
Nanded Crime Love Story: नांदेडच्या प्रेमप्रकरणाचा जातीय विखारामुळे भयंकर शेवट, सक्षम ताटेची केस प्रकाश आंबेडकर लढवणार का? अंजली आंबेडकर म्हणाल्या...
सक्षम-आचलला न्याय देण्यासाठी प्रकाश आंबेडकर कोर्टात युक्तिवाद करणार? अंजली आंबेडकर म्हणाल्या...
Weakest Currency 2025 : डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
बेळगावात अग्निवीरांचा शानदार दीक्षांत समारंभ; 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण
बेळगावात अग्निवीरांचा शानदार दीक्षांत समारंभ; 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं गाठला उच्चांक, सोनं 957 रुपयांनी महागलं, 24 कॅरेट, 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या 
चांदी 4034 रुपयांनी महागली, नवा उच्चांक गाठला, सोनं 957 रुपयांनी महागलं, सोन्याचा दर किती? जाणून घ्या
Embed widget