एक्स्प्लोर

तुम्ही उपमुख्यमंत्री झालात, आता मुख्यमंत्री होणार नाहीत, काँग्रेसच्या 'या' नेत्याचा फडणवीसांसह अजित पवारांना टोला 

तुम्ही उपमुख्यमंत्री झालात आता मुख्यमंत्री होणार नाहीत, असेा टोला काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना लगावला.

Amit Deshmukh Latur News : महाराष्ट्राचा इतिहास आहे, की इथं उपमुख्यमंत्री बनणारा माणूस पुन्हा मुख्यमंत्री होत नाही, असं म्हणत काँग्रेस नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना टोला लागवला. तुम्ही उपमुख्यमंत्री झालात आता मुख्यमंत्री होणार नाहीत, असे देशमुख म्हणाले. लोकसभेचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात असलेल्या रोकडा सावरगाव येथे काँग्रेस पक्षाची जाहीर सभा होती. या सभेसाठी काँग्रेस नेते नाना पटोले आमदार अमित देशमुख आणि काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगें हे उपस्थित होते. यावेळी देशमुखांनी टोलेबाजी केली. 

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लातूर येथे जाहीर सभा झाली होती. त्या सभेत मांडण्यात आलेल्या मुद्द्यावर चौफेर टीका करत अमित देशमुख यांनी पुन्हा भाजप सरकार येत नसल्याचा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्राचा इतिहास आहे की इथं उपमुख्यमंत्री बनणारा माणूस पुन्हा मुख्यमंत्री होत नाही असे अमित देशमुख म्हणाले. दरम्यान, काँग्रेसचे तिकीट मिळवणं सोपी गोष्ट नाही. डॉक्टर शिवाजी काळगे यांना तिकीट मिळाला आहे. विलासराव देशमुख यांचे काम होतं, कार्य होतं, तरी त्यांना अमितला तिकीट द्या असं म्हणता आलं नाही. माझं तिकीट रात्री तीन वाजता कन्फर्म झालं आणि त्यानंतर बातमी आली, 
काँग्रेसमध्ये तिकीट मिळवणं सोपी गोष्ट नसल्याचे अमित देशमुख म्हणाले. 

एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री हे लोकांना पटलं नाही

एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री हे लोकांना पटलं नसल्याचे देशमुख म्हणाले. महाराष्ट्राचा इतिहास आहे की, एकदा उपमुख्यमंत्री बनलेला माणूस पुन्हा मुख्यमंत्री बनतच नाही असे देशमुख म्हणाले. येतो येतो म्हणणारे येतच नसतात असा टोलाही त्यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहमदपूरचे नेते विनायकराव पाटील हे माजी राज्यमंत्री आहेत. विनायकराव ज्या आघाडीत जातात तिकडे विजय निश्चित असतो. असंही ते म्हणाले.

सर्व भागात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगला पाठिंबा 

मराठवाड्यात मी अनेक ठिकाणी जाऊन आलो छत्रपती संभाजीनगरपासून सोलापूरपर्यंत सर्व भागात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगला पाठिंबा आहे. त्यामुळं आब की बार 400 पार म्हणणाऱ्या पक्षाने इंडिया आघाडीची नोंद तिसऱ्या टप्प्यात घेतलेली आहे. अजून चौथा आणि पाचवा टप्पा बाकी असल्याचं देशमुख म्हणाले. देशातील सगळ्या राज्यात भाजप प्रचार करतोय मात्र सर्वत्र मुद्दे तेच आहेत असंही ते म्हणाले. 

कारखाना भारताचा चालवणार परदेशी कंपनी

लातूरला आले होते, त्यांनी तेच मुद्दे पुन्हा सांगितले. लातूरला रेल्वे बोगी कारखाना सुरू करण्यात आला आहे. 2019 ला बुलेट ट्रेनची कोच तयार करणार आहेत. 2024 ला वंदे भारतची कोच करणार आहेत. आतमध्ये फक्त सापळा उभा केलेला आहे, काहीच नाहीमध्ये असेही ते म्हणाले. कारखाना भारताचा आहे मात्र परदेशी कंपनी तो चालवणार असल्याची माहिती मिळत असल्याचे देशमुख म्हणाले. नांदेड लातूर अहमदपूर रेल्वे विकसित झाली पाहिजे. याचा आम्ही नक्कीच पाठपुरावा करू. त्या भागात महाविकास आघाडीचा साखर कारखाना आहे. इथल्या ऊसालाही घड्याळाचे चिन्ह आहे. इथल्या ऊसाला घड्याळ असेल तरच ऊस साखर कारखान्यात जातो असे देशमुख म्हणाले. आम्ही कधी राजकारण करत नाही आम्ही समाजकारण करतो असेही देशमुख म्हणाले. देवेंद्र फडणवीसने मान लिया है की ओ हार रहे, और नाना पटोलेने ठाण लिया है वो जित रहे है असेही ते म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्यZero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget