एक्स्प्लोर

Maharashtra Vidhansabha Election 2024: वडील आजारी, लेकाने सूत्र हातात घेतली; 15 निष्ठावंतांना आदित्य ठाकरेंचा शब्द, मातोश्रीवरच्या बैठकीत काय घडलं?

Aditya Thackeray Maharashtra Vidhansabha 2024: माजी मंत्री आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मातोश्रीवर एक महत्वाची बैठक पार पडली.

Maharashtra Vidhansabha Election 2024 Aditya Thackeray मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या विद्यमान आमदारांची मुंबईत आज मातोश्री निवासस्थानी बैठक पार पडली. माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यामान आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत आदित्य ठाकरेंनी विद्यामान आमदारांना निवडणुकीच्या प्रचारासाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. काही दिवसांआधीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे विश्रांती घेत असल्यामुळे आदित्य ठाकरेंनी आज ठाकरे गटाच्या विद्यामान आमदारांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यामान आमदारांना पक्षाकडून उमेदवारीचा शब्द देखील देण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये लवकरच विद्यामान आमदारांना एबी फॉर्म दिले जाणार आहे. 

यादी जाहीर होण्याची वाट बघू नका-

उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या सर्व विद्यमान आमदारांची बैठक पार पडली. उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज जरी मिळाला असला तरी विश्रांती घेत असल्याने आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या इतर नेत्यांसोबत विद्यमान आमदारांची बैठक पार पडली. शिवसेनेच्या विद्यमान आमदारांना कामाला लागण्याच्या सुचना यामध्ये देण्यात आले. बहुतांश विद्यमान आमदारांना उमेदवारीची खात्री देण्यात आली आहे. यादी जाहीर होण्याची वाट बघू नका, तुमच्याबाबतीत ती सर्व औपचारिकता आहे, असं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. विद्यमान आमदारांसोबत इतरही काही  जणांना मातोश्रीवर आज बैठकीला बोलावलं होतं. त्याचप्रमाणे जे उमेदवारीसाठी इच्छुक होते,  त्यांचीदेखील उमेदवारी निश्चित  मानली जात आहे.

विद्यामान आमदारांसह कोण-कोण उपस्थित होत?

स्नेहल जगताप - महाड मतदारसंघ

सुधाकर बडगुजर - नाशिक पश्चिम

अद्वय हिरे - मालेगाव बाह्य नाव आघाडीवर

नितीन सावंत - कर्जत मतदारसंघ

अनिल कदम - निफाड

मातोश्रीच्या अंगणात वरुण सरदेसाईंना उमेदवारी-

ठाकरे गटाकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून वांद्रे पूर्व मतदारसंघातून युवासेना सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी जाहीर केले आहे. यानंतर वरुण सरदेसाई यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. डबल ग्रॅज्युएट आणि लोकांच्या संपर्कात राहणारा, असं म्हणत वरुण सरदेसाई यांनी प्रचार सुरु केला आहे.  त्यामुळे मातोश्रीच्या अंगणात वरुण सरदेसाई विरुद्ध स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांच्यात लढत होणार असल्याचं जवळपास निश्चित झाले आहे. 

आणखी वाचा:

Maharashtra VidhanSabha Election 2024: शेवट गोड करण्यासाठी सगळ्यांचा अट्टाहास; 'शिवाजी पार्क'वर सभेसाठी एकाच दिवशी 4 पक्षांनी ठोकला शड्डू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीचा जागावाटपाचा अंतिम निर्णय आज होणार? फडणवीसांसह अजित पवार दिल्लीत दाखल, अमित शाहंसोबत होणार बैठक
महायुतीचा जागावाटपाचा अंतिम निर्णय आज होणार? फडणवीसांसह अजित पवार दिल्लीत दाखल, अमित शाहंसोबत होणार बैठक
साखर पट्ट्यातील माढ्यात विधानसभेला महाविकास आघाडी की महायुती; पवारांच्या बालेकिल्ल्यात कोण जिंकणार
साखर पट्ट्यातील माढ्यात विधानसभेला महाविकास आघाडी की महायुती; पवारांच्या बालेकिल्ल्यात कोण जिंकणार
मुंबईतील मध्य रेल्वेलाईनवर लोकल रुळावरुन घसरली; वाहतूक खोळंबली
मुंबईतील मध्य रेल्वेलाईनवर लोकल रुळावरुन घसरली; वाहतूक खोळंबली
Salim Khan Exclusive: बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
Video : बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thackeray Group Special Report : राजन तेलींची 19 वर्षांनी घरवापसी:भाजपला रामरामRajkiya Shole : जागांवरून खटका कुणाला झटका ? 18 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaVidhansabha Superfast News : विधानसभा निवडणुकांच्या प्रत्येक बातम्या एका क्लिकवर : 18 October 2024Zero Hour : अमित ठाकरेंसाठी ठाकरे बंधू मुलांसाठी ॲडजस्टमेंट करणार ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीचा जागावाटपाचा अंतिम निर्णय आज होणार? फडणवीसांसह अजित पवार दिल्लीत दाखल, अमित शाहंसोबत होणार बैठक
महायुतीचा जागावाटपाचा अंतिम निर्णय आज होणार? फडणवीसांसह अजित पवार दिल्लीत दाखल, अमित शाहंसोबत होणार बैठक
साखर पट्ट्यातील माढ्यात विधानसभेला महाविकास आघाडी की महायुती; पवारांच्या बालेकिल्ल्यात कोण जिंकणार
साखर पट्ट्यातील माढ्यात विधानसभेला महाविकास आघाडी की महायुती; पवारांच्या बालेकिल्ल्यात कोण जिंकणार
मुंबईतील मध्य रेल्वेलाईनवर लोकल रुळावरुन घसरली; वाहतूक खोळंबली
मुंबईतील मध्य रेल्वेलाईनवर लोकल रुळावरुन घसरली; वाहतूक खोळंबली
Salim Khan Exclusive: बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
Video : बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
Shahrukh Khan: अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
NCP Candidate list : बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
Embed widget