Maharashtra VidhanSabha Election 2024: शेवट गोड करण्यासाठी सगळ्यांचा अट्टाहास; 'शिवाजी पार्क'वर सभेसाठी एकाच दिवशी 4 पक्षांनी ठोकला शड्डू
Maharashtra VidhanSabha Election 2024: राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वंच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.
Maharashtra VidhanSabha Election 2024 मुंबई: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Elections 2024) मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान, तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडेल.
राज्यातील विधानसभा निवडणुका (Maharashtra Vidhan Sabha Elections 2024) जाहीर झाल्यानंतर सर्वंच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यात आता विविध ठिकाणी राजकीय सभांचा धडाका पाहायला मिळेल. याचपार्श्वभूमीवर दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजे शिवाजी पार्क मैदानासाठी चार पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे.
मैदानासाठी 4 पक्षांमध्ये रस्सीखेच-
विधानसभा निवडणूकीसाठी छत्रपती शिवाजी मैदासाठी 4 पक्षांत रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना, भाजप आणि मनसे यांच्यात मैदान मिळवण्यासाठी चुरस रंगली आहे. 17 नोव्हेंबरसाठी या चारही पक्षांनी अर्ज केला आहे. 18 नोव्हेंबरला प्रचार थंडावतात, त्यामुळे 17 तारखेला या मैदानासाठी चढाओढ सुरु आहे. शिवसेना उबाठा, भाजप, शिवसेना शिंदेगट, आणि मनसेकडून अर्ज करण्यात आला आहे. मात्र अर्ज पहिल्यांदा मनसेकडून आला असल्याने मनसेच्या सभेला परवानगी मिळावी, अशी मागणी मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी केली आहे.
भाजपकडून मुंबईतील 5 आमदारांचा पत्ता कट होणार?
भाजपकडून मुंबईत राम कदम यांच्यासह पाच आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. या माध्यमातून भाजपच्या जुन्या नेत्यांचे विधानसभेत पुनर्वसन केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. वर्सोवा विधानसभेत विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांच्याऐवजी संजय पाण्डेय यांना उमेदवारी मिळू शकते. तर घाटकोपरमध्ये राम कदम यांचा पत्ता कट झाल्यास महायुतीचा चेहरा कोण असेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तर सायन मतदारसंघात कॅप्टन तमिल सेल्वन यांच्याऐवजी राजश्री शिरवडकर यांना संधी मिळू शकते. घाटकोपर पूर्व मतदारसंघात पराग शहा यांच्याऐवजी प्रकाश मेहता यांना पुन्हा संधी मिळू शकते. तर बोरिवली मतदारसंघात सुनील राणे यांच्याऐवजी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.
महाराष्ट्र विधानसभेचं संपूर्ण वेळापत्रक-
अर्ज भरण्याची तारीख - 29 ऑक्टोबर
अर्ज माघार घेण्याची तारीख - 4 नोव्हेंबर
मतदानाची तारीख - 20 नोव्हेंबर
मतमोजणीची तारीख - 23 नोव्हेंबर
288 जागांसाठी किती मतदार असतील?
एकूण मतदार - 9 कोटी 59 लाख
नव मतदार - 19.48 लाख
पुरूष मतदार - 4.95 कोटी
महिला मतदार - 4.64 कोटी
तृतीयपंथी मतदार - 56 हजारांहून जास्त
85 वर्षावरील मतदार - 12. 48 लाख
शंभरी ओलांडलेले मतदार - 49 हजारांहून जास्त
दिव्यांग मतदार - 6.32 लाख