ABP C Voter Survey : उत्तराखंडमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये अटीतटीचा सामना, जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणार?
ABP C Voter Survey : यूपी, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. पुढील काही दिवसांत या राज्यात निवडणूका होणार असून या राज्यातील सत्तेची समीकरणंही स्पष्ट होतील.
ABP C Voter Survey for Uttarakhand : विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. अशातच सर्व पक्षीयांकडून निवडणूक प्रचारासाठीच्या रणनीती देखील ठरवल्या जात आहेत. उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुका रंजक होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2017 सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्याने भाजपच्या बाजूने कल देत 56 जागा दिल्या होत्या, तर काँग्रेसच्या वाट्याला 11 जागा आल्या होत्या. याव्यतिरिक्त अन्य जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली होती. एबीपी न्यूज सी वोटर सर्व्हेनुसार आम्ही उत्तराखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात मतदार राजाच्या मनात कौल जाणण्याचा प्रयत्न केला. या सर्व्हेत कोणत्या पार्टीला मतदारांकडून कौल दिला जातो हे देखील आम्ही जाणण्याचा प्रयत्न केला.
एबीपी न्यूज सी वोटरच्या सर्व्हेत उत्तराखंडमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळू शकते. सर्व्हेच्या आकडेवारीनुसार भाजप आणि कॉंग्रेसमध्येच थेट लढत बघायला मिळू शकते. भाजपला 39 टक्के मताची टक्केवारी मिळताना बघायला मिळत आहे. तर तिकडे काँग्रेसच्या पारड्यात 37 टक्के मतं पडतील असा अंदाज आहे. आम आदमी पक्षाला देखील 13 टक्के मतं पडताना दिसत आहे. अपक्षांच्या वाट्याला देखील 11 टक्के मतं जातील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तराखंडमध्ये कोणाला किती वोट?
एकूण जागा - 70
भाजप - 37 टक्के
काँग्रेस - 37 टक्के
आप - 13 टक्के
अन्य - 11 टक्के
सर्व्हेनुसार 70 जागांपैकी भाजपला 31 ते 37 जागा मिळतील असा अंदाज लावला जात आहे. तेच कॉंग्रेसला देखील 30 ते 36 जागा मिळताना बघायला मिळत आहे. याचसोबत आम आदमी पक्षाला 2 ते 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. ह्याचसोबत अपक्षांच्या वाट्याला देखील एक जागा जाताना बघायला मिळत आहे.
उत्तराखंडमध्ये कोणाला किती जागा?
एकूण सीट - 70
भाजप - 31- 37
कांग्रेस - 30-36
आप - 2-4
अन्य - 0-1
कुणाला किती टक्के मते?
भाजप - 38.6 टक्के
काँग्रेस - 37.2 टक्के
आप - 12.6 टक्के
इतर - 11.7 टक्के
फायदा की तोटा?
भाजप
2017 - 57
2022 - 34 (31-37)
तोटा - 23
काँग्रेस
2017 - 11
2022 - 33 (30-36)
तोटा - 22
मुख्यमंत्री म्हणून पसंती कुणाला?
हरीश रावत - 37 टक्के
पुष्करसिंह धामी - 29 टक्के
अनिल बालुनी - 18 टक्के
अजय कोतियाल - 9 टक्के
इतर - 7 टक्के
सूचना : आजचा ओपिनियन पोल सी-व्होटर या संस्थेनं केलेला आहे. यासाठी RDD पद्धतीनुसार 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या पाचही राज्यातून वेगवेगळ्या वयोगटातील 89 हजार 536 जणांची मतं जाणून घेतली आहेत. हा ओपिनियन पोल 12 डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान करण्यात आला आहे. बदलत्या स्थितीनुसार या पोलमध्ये 3 ते 5 टक्क्यांची त्रुटी जाणवण्याची शक्यता आहे. मात्र हा निकश सगळ्या वर्गीकरणासाठी लागू होईल असं नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या :