Assembly Election 2022 ABP CVoter Survey LIVE : पाच राज्यांतील सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती? जाणून घ्या 'एबीपी'चा ओपिनियन पोल 2022 काय सांगतो
ABP Opinion Poll Live Updates: पाच राज्यांतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने केलेल्या 'ओपिनियन पोल 2022'ची प्रत्येक अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
Punjab Election 2022 Date : पंजाबमध्ये 117 जागांवर एकाच टप्यात होणार मतदान, १० मार्चला निकाल
देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यातच आलेल्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या प्रादुर्भावामुळे चिंतेत भर पडली आहे. देशावर कोरोनाच्या संकटकाळात उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात पार पडणार आहेत. तर पंजाब गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. 10 मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पंजाबमध्ये 117 जागांवर एकाच टप्यात मतदान होणार आहे. पंजाबमध्ये विधानसभाच्या 117 जागा आहेत. पंजाब विधानसभेचा कार्यकाळ 27 मार्च 2022 रोजी संपणार आहे.
निवडणूक आयोगाने शनिवारी निवडणूकांची घोषणा केली. त्यानुसार, 14 फेब्रुवारी 2022 रोजी पंजाबमध्ये मतदान होणार आहे. 28 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करु शकता येईल. 29 जानेवारी रोजी अर्जाची पडताळणी होईल. 31 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ असेल. दहा मार्च रोजी निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणूकीच्या तारखांसोबतच कोरोना नियमावलीही जारी केली आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि संयुक्त समाज मोर्चा एकत्र निवडणूक लढवणार नाही, बलबीर सिंह राजेवाल यांची घोषणा
Punjab Election 2022 : निवडणूक आयोगाने 5 राज्यांच्या निवडुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली करण्यास सुरूवात केली आहे. पंजाबमध्येसुद्धा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि नव्याने निर्माण झालेली संयुक्त समाज मोर्चा (SSM) हे एकत्र निवडणुका लढवण्याची चर्चा सुरू होती. पण अखेर या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. कारण संयुक्त समाज मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी आम आदमी पार्टीसोबत आमची युती होणार नाही अशी घोषणा केली आहे. एका आठवड्याच्या आत आम्ही पक्षाच्या उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे बलबीर सिंह राजेवाल यांनी सांगितले आहे.
मणिपूरमध्ये कुणाला मिळणार किती जागा?
भाजप 23-27
काँग्रेस 22-26
एनपीएफ 2-6
इतर 5-9
मणिपूरमधून आश्चर्यकारक आकडेवारी समोर
भारतात आगामी काळात पाच राज्यात निवडणूका होणार असून मणिपूर राज्यांतील आकडेवारी अगदी आश्चर्यकारक आहे. मणिपूरमध्ये 60 विधानसभा सीट असून 27 फेब्रुवारी ते 3 मार्च यादरम्यान दोन टप्प्यांत हे मतदान पार पडणार आहे. या सर्वेनुसार 35 टक्के मतं भाजपाला मिळणार असून काँग्रेसला 33 टक्के तर एनपीएफला 11 आणि इतरांना 21 टक्के मतं मिळणार असल्याचं समोर आलं आहे.
पंजाब काँग्रेसच्या हातून निसटणार? आप बाजी मारण्याची शक्यता तर भाजप चौथ्या स्थानी
पंजाबमध्ये मुख्य लढत ही आप आणि काँग्रेसमध्येच असल्याचं दिसून येतंय. यामध्ये आप सत्तेत येण्याची शक्यता असून आपला 52 ते 58 जागा मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला 37 ते 43 जागा मिळण्याची शक्यता आहे. अकाली दलाला 17 ते 23 आणि भाजपला केवळ 1 ते 3 जागा मिळण्याची शक्यता या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आली आहे.
पंजाबमध्ये चरणजीत चन्नी यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी पसंती
सर्वेक्षणानुसार, राज्यातील 6 टक्के जनता कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्री म्हणून पसंत करत आहेत. सुखबीर सिंह बादल यांना 15 टक्के, अरविंद केजरीवाल 17 टक्के, चरणजीत सिंह चन्नी 29 टक्के, नवज्योत सिंघ सिद्धू 6 टक्के, भगवंत मान 23 टक्के आणि इतरांना 4 टक्के मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवत आहेत.
गोव्याचा फेव्हरेट मुख्यमंत्री कोण? प्रमोद सावंत आघाडीवर
या सर्व्हेमध्ये भाजपचे प्रमोद सांवत यांना 34 टक्के मते मिळाली आहे. तर आपचे उमेदवार 19 टक्के मते मिळाली आहे. तर भाजपचे विश्वजीत राणे 16 टक्के मते मिळाली आहे. कॉंग्रेसचे दिगंबर कामत यांना 9 टक्के तर इतरांना 22 टक्के मते मिळाली आहे.