एक्स्प्लोर

Rajya Sabha Election 2026: राजकारण कोळून प्यायलेल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी का दिली? संजय शिरसाटांनी सांगितलं पडद्यामागचं राज'कारण'

Rajya Sabha Election 2026: ज्योती वाघमारे यांना राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Rajya Sabha Election 2026: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. या निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार आधीच निश्चित केले होते. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून (Shiv Sena) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राज्यसभेचा उमेदवार कोण असणार, याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता कायम होती. अखेरीस शिंदे यांच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे  (Jyoti Waghmare) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता मंत्री संजय शिरसाट यांनी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी का दिली? याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

संजय शिरसाट म्हणाले की, तुमचा सस्पेन्स दूर केला आहे. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. शिंदे साहेब माझी लाडकी बहीण म्हणतात, लाडक्या बहिणीला उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. या निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ.  शिंदे साहेब सगळ्यांना सामावून घेतात. कोणी नाराज असेल तर त्यांची नाराजी एकनाथ शिंदे दूर करतील, असे त्यांनी म्हटले. 

Sanjay Shirsat : ...म्हणून ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी

संजय शिरसाट पुढे म्हणाले की,  नेमका वेळेला, नेमका विचार म्हणजे एकनाथ शिंदे. आम्ही मानसिक आणि राजकीय बळ वाघमारे यांना दिले आहे. सर्वसामान्य शिवसैनिक जी एका छोट्या गावातून येते. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी त्यांना नाही. पण, त्यांनी सभा गाजवल्या. शिवसेनेत येऊन मेहनत घेतली आहे. त्यामुळे या सगळ्यांचा विचार करून निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.  

Rajya Sabha Election 2026: शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडून नाराजी 

दरम्यान, शिंदे यांच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडून नाराजी व्यक्त  केली आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी एबीपी माझाशी बोलताना आपली नाराजी व्यक्त केली आहे.  अमित शाह यांच्याकडून राज्यपाल पदाचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, दोन वर्ष उलटून गेले तरी सुद्धा आश्वासन पूर्ण केलं नाही. मी चार टर्म खासदार राहिलो आहे. मला संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी माझं नाव द्यावं, ही माझी इच्छा होती. मात्र, ज्योती वाघमारे यांचं नाव कसं समोर आलं? हे मला कळलं नाही, असे आनंदराव अडसूळ यांनी म्हटले आहे.  

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य- (Retiring Rajya Sabha members from Maharashtra)

शरद पवार (श.प. गट)
रामदास आठवले (रिपाई) 
फौजिया खान (श.प. गट)
रजनी पाटील (काँग्रेस)
प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना)
धैर्यशील पाटील (पेण- भाजप)
भागवत कराड (भाजप)

Maharashtra Candidate List Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कोणाला उमेदवारी? 

भाजपचे उमेदवार- (BJP Rajya Sabha Election Candidate List)

  • रामदास आठवले (Ramdas Athawale) 
  • विनोद तावडे (Vinod Tawde) 
  • माया चिंतामण ईवनाते (Maya Ivnate) 
  • रामराव वडकुते (Ramrao Wadkute) 

शिवसेना शिंदे गट-

  • ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट-

  • पार्थ पवार (Parth Pawar)

महाविकास आघाडी - शरद पवार (Sharad Pawar)

राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)

5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
6 मार्च – अर्जांची छाननी
9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान; सायं. 5 नंतर मतमोजणी

आणखी वाचा 

Rajya Sabha Election 2026: ज्येष्ठ नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते पण ऐनवेळी एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याने शिवसेनेत नाराजी

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी, महिला संतापली; कारमधून उतरत मंत्री महाजनांना सुनावलं
Video: मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी, महिला संतापली; कारमधून उतरत मंत्री महाजनांना सुनावलं
बारामतीच्या सांगता सभेवेळी शरद पवारांचं अचूक टायमिंग; रुग्णालयातून भावनिक आवाहन, 1967 पासूनचा उल्लेख
बारामतीच्या सांगता सभेवेळी शरद पवारांचं अचूक टायमिंग; रुग्णालयातून भावनिक आवाहन, 1967 पासूनचा उल्लेख
Video: बारामतीमधील सभेसाठी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Video: बारामतीमधील सभेसाठी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Supriya Sule : वादविवादाचं टेबल राजकीय 'लेव्हल' Special Report
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : ठाकरेंच्या कोट्या, भाजपची चर्चा Special Report
Praful Patel Baramati Speech : बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Devendra Fadnavis Speech Baramati : ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन
Sunetra Pawar Speech Baramati : दादांच्या अपघातावर पहिल्यांदाच शंका, मुख्यमंत्र्यांसमोर भावूक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : पाच वर्षात 70 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 1700 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांना 2200 टक्के रिटर्न, जाणून घ्या
पाच वर्षात 70 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 1700 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांना बनवलं मालामाल
Kerala Blast : केरळमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 13 जणांचा मृत्यू, मृतदेहाचे अवयव विखुरले
केरळमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 13 जणांचा मृत्यू, मृतदेहाचे अवयव विखुरले
Cibil Score : खराब सिबिल स्कोअरमुळं कर्ज मंजूर होईना? सिबिल स्कोअर 800  च्या पार कसा पोहोचवणार?
Cibil Score : खराब सिबिल स्कोअरमुळं कर्ज मंजूर होईना? सिबिल स्कोअर 800  च्या पार कसा पोहोचवणार?
बालविवाह मुक्त अभियान, ‘स्पेशल फोर्स’ची धडक कारवाई; राज्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 22 बालविवाह रोखले
बालविवाह मुक्त अभियान, ‘स्पेशल फोर्स’ची धडक कारवाई; राज्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 22 बालविवाह रोखले
Trump Tariffs: डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, टॅरिफ म्हणून वसूल केलेले पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु, भारताला फायदा होणार?
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, टॅरिफ म्हणून वसूल केलेले पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु, भारताला फायदा होणार?
Good Loan vs Bad Loan :  सर्व कर्ज वाईट असतात का? चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज यातील फरक कसा ओळखावा? वाईट कर्जातून बाहेर कसं पडायचं?
सर्व कर्ज वाईट असतात का? चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज यातील फरक कसा ओळखावा? वाईट कर्जातून बाहेर कसं पडायचं?
लोणावळा फिरायला जाताय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान; व्हिला बुकींचा स्कॅम, पर्यटकाची हजारोंना फसवणूक
लोणावळा फिरायला जाताय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान; व्हिला बुकींचा स्कॅम, पर्यटकाची हजारोंना फसवणूक
Home Loan : 50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे? जाणून घ्या फॉर्म्युला
50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे? जाणून घ्या फॉर्म्युला
Embed widget