एक्स्प्लोर

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट 18 फेब्रुवारीपासून मिळणार ऑनलाईन

SSC board exam : दहावी बोर्ड परीक्षा 15 मार्च पासून सुरु होणार आहे. दरम्यान परीक्षेचे हॉल तिकीट 18 फेब्रुवारी दुपारी एक वाजल्यापासून बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध केले जाणार आहे.

SSC board exam : बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात पार पडणार आहेत. वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत आहे. तर त्यानंतर दहावीची परीक्षा (SSC Exam) 15 मार्चपासून पार पडणार आहे. दरम्यान दहावी परीक्षेसाठी हॉल तिकीट 18 फेब्रुवारीला दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हॉल तिकीट बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध केले जाणार आहे. 

दहावी बोर्डाचे ऑनलाइन हॉल तिकीट www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे. दरम्यान ऑनलाइन हॉल तिकीट शाळेकडून प्रिंट करून आणि मुख्याध्यापकांची सही, शिक्का मारून विद्यार्थ्यांना वितरित केले जाणार आहे. हॉलतिकीट मिळवताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधायचा असल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्याकडून त्यासाठी कोणतेही शुल्क न घेता सदर हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी अशा सूचनाही शाळांना देण्यात आल्या आहेत. 

 कसं कराल डाऊनलोड?

  1. सर्वात आधी तुम्ही वापरत असलेल्या इंटरनेट ब्राऊजरमधून www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर जा.
  2. त्यांनंतर College login या पर्यायामध्ये जाऊन त्याठिकाणी हॉल तिकीट ऑनलाइन डाउनलोड करु शकता. 

दरम्यान संबधित ऑनलाइन हॉल तिकीट सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील उच्च माध्यमिक शाळा त्यासोबत कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. हॉल तिकीटात विषय आणि माध्यम बदला संदर्भात दुरुस्त्या असल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने विभागीय मंडळात जाऊन त्या दुरुस्त करून घ्यावयाच्या असल्याची माहितीही शासनाने दिली आहे. हॉल तिकीटावर फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्ती बाबत उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांनी त्यांच्या स्तरावर फक्त त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे. हॉल टिकीट विद्यार्थ्यांकडून हरवल्यास संबंधित शाळा महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने 'द्वितीय प्रत'( डुप्लिकेट)असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यायचे आहे.

दहावी परीक्षेचा सविस्तर वेळापत्रक- 

  • 15 मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
  • 16 मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा 
  • 19 मार्च : इंग्रजी 
  • 21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
  • 22 मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय  (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
  • 24 मार्च : गणित भाग - 1
  • 26 मार्च : गणित भाग 2
  • 28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
  • 30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 
  • 1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1
  • 4 एप्रिल :  सामाजिक शास्त्र पेपर 2

महत्वाच्या बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Yavatmal Ashram School: विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
Tukaram Mundhe School Canteen Marathi News: आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
MPSC Paper Leak: MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget