एक्स्प्लोर

Maharashtra SSC Result 2022 : 10 वी नंतर काय कराल? 'या' क्षेत्रात करिअरच्या हजारो संधी, जाणून घ्या

SSC 10th Result 2022 : आज इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होत आहे. दहावीतर करिअरच्या कोणकोणत्या संधी निर्माण होऊ शकतात. जाणून घ्या काही करिअर ऑप्शनच्या टिप्स.

SSC 10th Result 2022 : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर (Maharashtra SSC Results 2022 Declared) होत आहे. बोर्डाकडून आज दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे, दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या समोर आता करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न उपस्थित राहिले आहेत. करिअरबाबतची ही चिंता ज्यांनी मेरिट लिस्टमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे, त्यांनाही आहे आणि जे उत्तीर्ण झाले आहेत त्यांनाही आहे. 

10 वी नंतर काय कराल? 'या' क्षेत्रात करिअरच्या हजारो संधी

दहावीच्या निकालानंतर आता काय करायच? नेमकं कशामध्ये करियर करायचं? दहावीनंतर पुढे कोणता करिअर ऑप्शन निवडावा?  कोणता मार्ग सोप्पा? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असतात. यासाठी यासाठी आम्ही तुम्हाला काही पर्याय तसेच शाखांनुसार मार्ग सांगणार आहोत. ज्याच्या साहाय्याने तुम्ही तुमचे उज्ज्वल भविष्य घडवू शकता. 

विज्ञान (Science)
इंजिनिअरिंग, मेडिकल, आयटी यांसारखेच पर्याय विज्ञान शाखेतून उपलब्ध आहेत. 
-मायक्रोबायोलॉजी, ओशिनोग्राफी, बॉटनी यांसारख्या प्युअर सायन्समध्येही उत्तम करिअरच्या संधी आहेत. 
-बीएससी, एम.एसस्सी करून रिसर्चकडे वळता येते. 
-बीफार्मसीद्वारे मेडिसिनमध्ये करिअर करता येईल. फार्मसीचा डिप्लोमाही करता येतो. 
-बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन एव्हिएशन, फूड सायन्स, फॉरेन्सिक सायन्स, एन्व्हायर्न्मेंटल सायन्स , 
-मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, बायो टेक्नॉलॉजी, लाइफसायन्स, मॅथेमेटिक्स यात उच्च शिक्षण घेता येते.

वाणिज्य (Commerce)
-वाणिज्यमधील बेसिक पदवीसोबत आता अकाउंटिंग आणि फायनान्समधील बीएएफ, बँकिंग 
-इन्श्युरन्समधील बीबीआय व फायनान्शिअल मार्केटिंगचे बीएफएम हे पदवीचे अभ्यासक्रम निवडता येतात. 
-बीएएफ, बीबीआय, बीएफएम यांसारखे कोर्स

-सीए, सीएस, एमबीए होण्यासाठी  प्रोफेशनल कोर्स
-बँकिंग क्षेत्रात जाण्यासाठी बीबीआय हा उत्तम पर्याय आहे, त्यात पुढे स्पेशलायजेशनही करता येईल. 
-कॉमर्समध्ये गणिताशिवाय अर्थशास्त्र, अकाउंटिंग, फायनान्स, टॅक्सेशन, इ-कॉमर्स, बिझनेस लॉ, बिझनेस मॅनेजमेंट, 
-ह्यूमन रिसर्च मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट असे अनेक पर्याय आहेत. 
-सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए, सीएफए यांसारख्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमांकडे वळण्याची संधीही उपलब्ध आहे.

कला ( Arts)

-कला शाखेमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. 
-वाङ्मय, भाषा, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्रात पदवी घेऊन नागरी सेवा, वित्तीय संस्था आदी विविध संस्थांमध्ये संधी
-इतिहास घेऊन आर्किओलॉजी, संग्रहालय संशोधन, शैक्षणिक संस्था आदी पर्याय आहेत. 
-सायकॉलॉजी विषयातून पुढे सायकॉलॉजीस्ट, चाइल्ड सायकॉलॉजिस्ट, करिअर कौन्सिलर.

संरक्षण (Defence)

-एअरफोर्स, आर्मी, नेव्ही या तीन संरक्षण विभागात दहावीनंतर विद्यार्थी लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी देऊन रुजू होऊ शकतात. 
-दहावीनंतर लगेचच विद्यार्थ्यांना अधिकारी पदावर जाता येत नाही. अधिकारी पदासाठी पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. 
-सीआरपीएफ, बीएसएफ, आयआयबीपी, सीआयएसएफ अशा पॅरामिलिट्री फोर्स.

पॅरामेडिकल कोर्स

-फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपी, ऑडिओलॉजी, प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोपेडिक्स, ऑक्टेमेट्रिक, वेटरनरी सायन्स, डेअरी टेक्नॉलॉजी आदी क्षेत्रात स्पेशलायझेशन.

-आयटीआय, डिप्लोमा (तंत्रशिक्षण)

-मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, प्रॉडक्शन, कॉम्प्युटर, शेतीशास्त्र, डिझाईनिंग, ऑटोमोबाईल यासारखे बेसिक डिप्लोमा कोर्स करून विद्यार्थ्यांसाठी करिअरचे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.

आज दहावीचा निकाल,  दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल लागणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल आज लागणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. त्याशिवाय,  MH10.ABPMajha.Com लिंकवर क्लिक करून थेट निकाल पाहता येणार आहे. दहावीच्या परीक्षेला 16,38, 964  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 8,89, 506  मुलं असून मुलींची संख्या 7, 49, 458  एवढी आहे. आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या वेबसाईटवरही विद्यार्थ्यांना जलद निकाल पाहता येणार आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर कसा चेक कराल?

स्टेप 1 : https://marathi.abplive.com/ वर लॉन ऑन करा
स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
स्टेप 3 : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
स्टेप 4 : तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल 
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget