एक्स्प्लोर

Maharashtra HSC Results 2020 LIVE | राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के

बारावीचा निकाल आज (16 जुलै) जाहीर होणार आहे. (HSC Results 2020 LIVE Updates | Maharashtra HSC Results 2020) आज दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. इथे पाहा बारावीच्या निकालासंदर्भात (MAH HSC Results 2020 LIVE Updates) संपूर्ण अपडेट्स...

LIVE

Maharashtra HSC Results 2020 LIVE | राज्याचा बारावीचा निकाल  90.66 टक्के

Background

Maharashtra HSC Results 2020 LIVE |   कोरोनाचं सावट यंदा विद्यार्थांच्या निकालावरही असल्याचं पाहायला मिळालं. परंतु, अखेर विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे. आज (16 जुलै) महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. यंदा 18 फेब्रुवारी ते 18 मार्ट दरम्यान महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. परंतु, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे निकाल जाहीर होण्यास उशिर झाला. मागच्या वर्षी 28 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे बारावीचा निकाल उशिरा जाहीर होत आहे.

Maharashtra HSC Results | बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर पाहता येतील

http://mahresult.nic.in/

यावर्षी बारावीच्या परिक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण 9923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आणि पूर्ण राज्यातील जवळपास 3036 परिक्षा केंद्रांवरुन ही बारावीची परिक्षा घेण्यात आली. यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे होते. विज्ञान शाखेचे 5 लाख 85 हजार 736, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 134, तर वाणिज्य शाखेचे 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी आहेत. व्यावसायीक अभ्यासक्रामाचे 57 हजार 373 विद्यार्थी आहेत. आता या परीक्षेचा आज निकाल लागणार आहे, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे.

12:00 PM (IST)  •  16 Jul 2020

राज्याचा बारावीचा विभागनिहाय निकाल : कोकण - 95.89 टक्के, पुणे - 92.50 टक्के, कोल्हापूर - 92.42 टक्के, अमरावती - 92.09 टक्के, नागपूर - 91.65 टक्के, लातूर - 89.79 टक्के, मुंबई - 89.35 टक्के, नाशिक - 88.87 टक्के, औरंगाबाद - 88.18 टक्के
11:57 AM (IST)  •  16 Jul 2020

राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के, 95.89 टक्क्यांसह कोकण विभाग अव्वल तर औरंगाबाद विभागाचा सर्वात कमी 88.18 टक्के निकाल
14:32 PM (IST)  •  16 Jul 2020

महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळाच्या बारावी (एचएससी) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी खचून जावू नये, त्यांच्या पालकांनीही निराश होऊ नये, यानंतरच्या परीक्षेत पूर्ण ताकदीने प्रयत्न करावा, जिद्दीने यश मिळावावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. बारावी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीची, भविष्याची दिशा स्पष्ट होत असते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुढील वर्गात प्रवेश घेताना त्यांच्या आवडीचा अभ्यासक्रम निवडावा, पालकांनी त्यासाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण मुभा द्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबरंच कौशल्यविकासावर, खेळ-व्यायामाकडेही लक्ष द्यावे, व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडवण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता पुन्हा यशस्वी होण्याची जिद्द बाळगली पाहिजे. केवळ एका परीक्षेतील अपयशाने सर्व दारे बंद होत नाहीत. एक दार बंद होते तेव्हा शंभर दारे खुली करण्याची जिद्द बाळगली पाहिजे. जीवनात करण्यासारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्यांचा शोध घेऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा व तिथे यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा, असा संदेशही उपमुख्यमंत्र्यांनी समस्त विद्यार्थी मित्रांना दिला आहे.
11:47 AM (IST)  •  16 Jul 2020

राज्याचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 90.66 टक्के इतका लागला आहे. मागच्या वर्षापेक्षा यंदा निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.
11:40 AM (IST)  •  16 Jul 2020

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळणे आणि पुनर्मूल्यांकनासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन अर्ज करावे लागत होते. पण आता या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरु केली जाईल. बारावीचे विद्यार्थी http://verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवरुन अर्ज करु शकतील. या अर्जासाठी लागणारी फी सुद्धा आॅनलाईन भरावी लागेल. 16 जुलैला बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर 17 जुलैपासून बारावीचे विद्यार्थी या वेबसाईटवरुन अर्ज दाखल करु शकणार आहेत.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget