एक्स्प्लोर

SWAYAM: स्वयम पोर्टलवर नववी ते मॅनेजमेंट, इंजिनिअरिंगचे 2,100 हून अधिक कोर्स, तेही मोफत; IIM बेंगलोर, AICTE सह नऊ संस्था राष्ट्रीय समन्वयक

SWAYAM Portal: देशातील सर्वोत्तम संस्थांसोबत करार करून भारत सरकारने 2100 हून अधिक कोर्स विनामूल्य उपलब्ध करुन दिले आहेत. सर्टिफिकेट हवं असेल तर त्यासाठी वेगळी परीक्षा द्यावी लागेल. 

मुंबई: उच्च शिक्षण घ्यायची तुमची इच्छा तर काही कारणांमुळे अपूर्ण राहिली असेल तर काहीही काळजी करू नका. भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या स्वयम पोर्टलवर (SWAYAM Portal) नववी ते पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन कोर्स करता येतात आणि तेही विनामूल्य. यामध्ये आयआयएम बेंगलोर (IIM Benglore) आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठांसारख्या (IGNOU) नऊ प्रतिष्ठीत संस्थां को-ऑर्डिनेटरच्या भूमिकेत असून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) विद्यापीठांना त्यांचे 40 टक्के अभ्यासक्रम ऑनलाइन करण्याची परवानगी दिली आहे. या अंतर्गत विद्यापीठे स्वयम पोर्टलचा वापर करू शकतील. स्वयम पोर्टल मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या पुढाकाराने चालवले जात आहे. यूजीसीच्या नियमानुसार विद्यार्थी विद्यापीठ, महाविद्यालयीन अभ्यासक्रम करण्यासोबतच पोर्टलवर स्वतः अभ्यास करू शकतील आणि तिथून मिळालेले गुणही त्यांच्या पदवीमध्ये ग्राह्य धरण्यात येतील. विशेष बाब म्हणजे विद्यार्थी पोर्टलवरच मोफत अभ्यास करू शकतात, यासाठी कोणतेही शूल्क आकारण्यात येणार नाही. जर एखाद्या कोर्ससाठी सर्टिफिकेट हवं असेल तर 1000 रुपये भरून दिलेल्या ठिकाणी परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्याचे सर्टिफिकेट मिळणार आहे. 

What Is Swayam Portal : स्वयम पोर्टल काय आहे?

भारत सरकारने फेब्रुवारी 2017 मध्ये स्वयम पोर्टल सुरू केले. याद्वारे नववीच्या वर्गापासून ते पदव्युत्तरपर्यंतचे विद्यार्थी विविध अभ्यासक्रम ऑनलाइन मोफत करू शकतात. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पुढाकाराने हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थी 2100 हून अधिक अभ्यासक्रम शिकू शकतात. यासाठी एक हजाराहून अधिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

स्वयंम हा भारत सरकारने सुरू केलेला एक कार्यक्रम आहे. प्रवेश, समानता आणि गुणवत्ता ही देशातील शैक्षणिक धोरणाची तीन मुख्य तत्त्वे साध्य करण्यासाठी देशातील नामांकीत शिक्षकांच्या मदतीने हा कोर्स डिझाइन करण्यात आलेला आहे. काही कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना सर्वोत्कृष्ट शिक्षणाची संधी देणे, शिक्षणाची गंगा तळागाळात पोहोचवणे हा या मागचा उद्देश आहे. डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून सर्व घटकांना ज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी स्वयंम 

SWAYAM वर आयोजित केलेले अभ्यासक्रम प्रकारामध्ये आयोजित केलेले आहेत,

(1) व्हिडीओ लेक्चर.
(2) खास तयार केलेले वाचन साहित्य, हे डाउनलोड करता येतं.
(3) टेस्ट आणि प्रश्नमंजुषांद्वारे स्व-मूल्यांकन चाचण्या.
(4) शंका निरसणासाठी ऑनलाइन डिस्कशन फोरम.

या माध्यमातून सर्वोत्तम शिक्षण मिळावं यासाठी खालील नऊ संस्थांची राष्ट्रीय को-ऑर्डिनेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, 

1. AICTE (All India Council for Technical Education) स्वयं शिक्षणासाठी आणि आंतरराष्ट्रीय कोर्ससाठी.
2. NPTEL (National Programme on Technology Enhanced Learning) अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी.
3. UGC (University Grants Commission) नॉन टेक्निकल पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स.
4. CEC (Consortium for Educational Communication) पदवीपूर्व शिक्षणासाठी.
5. NCERT (National Council of Educational Research and Training) शालेय शिक्षणासाठी.
6. NIOS (National Institute of Open Schooling) शालेय शिक्षणासाठी.
7. IGNOU (Indira Gandhi National Open University) दूरस्थ विद्यार्थ्यांसाठी.
8. IIMB (Indian Institute of Management, Bangalore) मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी.
9. NITTTR (National Institute of Technical Teachers Training and Research) शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी. 

Swayam Cources List : हे कोर्स करू शकता  

पोर्टलसाठी आर्ट, ह्युमॅनिटी, इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान, लॉ, मॅनेजमेंट, अॅग्रीकल्चर इत्यादी विषयांचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यासाठी https://swayam.gov.in/ या लिंकद्वारे नोंदणी करता येईल. नावनोंदणी प्रक्रियेचे दोन प्रकार आहेत. पोर्टलवर आधीच निश्चित कालावधीचे अभ्यासक्रम आणि इतर स्वयं-गती अभ्यासक्रम आहेत. निश्चित मुदतीच्या अभ्यासक्रमांना अंतिम मुदत असते. आणि सेल्फ-पेस कोर्सेससाठी वेळ मर्यादा नाही.

कोर्ससाठी प्रमाणपत्र मिळवायचे असेल तर त्याची माहिती आधी द्यावी लागेल आणि नंतर ते यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, विहित नियमांसह संबंधित संस्थेकडून प्रमाणपत्र प्राप्त केले जाते.

ही बातमी वाचा: 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाचTeam India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूकTeam India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवरTeam India Victory Parade : हिटमॅनची झलक, पांड्याचा स्वॅग;  टीम इंडियाची विजयी मिरवणूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
Embed widget