CAT 2023 Notification : IIM CAT 2023 परीक्षांसाठी अधिसूचना जारी; 2 ऑगस्टपासून नोंदणी सुरू
CAT 2023 Notification : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट लखनऊ लवकरच कॉमन अॅडमिशन टेस्ट 2023 साठी अधिसूचना जारी केली आहे.
CAT 2023 Notification : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट लखनऊ लवकरच कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT 2023) साठी अधिसूचना जारी केली आहे. या परीक्षेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार CAT 2023 च्या परीक्षेसाठी अर्ज सबमिट करण्यासाठी IIM ची अधिकृत वेबसाइट म्हणजे iimcat.ac.in तपासू शकतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) लखनऊ CAT 2023 परीक्षा आयोजित करणार आहे.
IIM वेबसाईटनुसार, CAT 2023 साठी नोंदणी 2 ऑगस्टपासून सकाळी 10 वाजता सुरू होईल आणि 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता संपेल. कॅट 2023 26 नोव्हेंबर रोजी तीन सत्रांमध्ये घेण्यात येईल तर परीक्षेचे प्रवेशपत्र 25 ऑक्टोबरपासून जारी केले जाईल.
अधिसूचनेनुसार, CAT 2023 सुमारे 155 चाचणी शहरांमध्ये पसरलेल्या चाचणी केंद्रांमध्ये आयोजित केले जाईल आणि उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार कोणतीही सहा चाचणी शहरे निवडण्याचा पर्याय दिला जाईल.
CAT 2023 ही प्रवेश परीक्षा आयआयएमसह देशभरातील बिझनेस स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी निवडलेल्या उमेदवारांसाठी घेतली जाते. कॅट परीक्षेच्या पद्धतीनुसार या परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असणार आहे. गेल्या वर्षीच्या पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिकेत एकूण तीन विभाग असतील. मौखिक क्षमता आणि वाचन आकलन, डेटा व्याख्या आणि तार्किक तर्क तसेच परिणामवाचक योग्यता.
अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षीच्या पात्रता कॅटेगरीमध्ये काहीही बदल केले नसेल तर त्यात मान्यताप्रताप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 50 टक्के गुणांसह पदवीधर पदवीचा समावेश असावा. तसेच, उमेदवारांना राखीव श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुणांमध्ये सूट मिळेल.
CAT 2023 परीक्षेची पात्रता
उमेदवाराने किमान 50 टक्के गुणांसह किंवा समान CGPA असलेली UG पदवी असावी.
अनुसूचित जाती (sc), अनुसूचित जमाती (ST) आणि अपंग व्यक्ती (pwd) श्रेणीतील उमेदवारांना 45 टक्के पात्रता गुण असणे आवश्यक आहे.
जे उमेदवार UG पदवीच्या अंतिम वर्षासाठी किंवा समकक्ष पात्रता परीक्षा देत आहेत. ज्यांनी पदवी पूर्ण केली आहे आणि निकालाची वाट पाहात आहेत ते या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
CAT 2023 साठी नोंदणी शुल्क
CAT 2023 परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी, उमेदवारांना SC, ST आणि PwD श्रेणीतील उमेदवारांसाठी 1200 रूपयांची नोंदणी शुल्क तर इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी 2400 रूपये भरावे लागतील .
अर्ज कसा करायचा?
- सर्वात आधी उमेदवारांनी IIM च्या अधिकृत वेबसाईटला म्हणजेच iimcat.ac.in या संकेतस्थळाला भेट द्या.
- त्यानंतर येथील मुख्यपृष्ठावरील CAT 2023 नोंदणीवर क्लिक करा.
- उमेदवारांनी युनिक युजर आयडी आणि पासवर्ड तयार करण्यासाठी नोंदणी करा.
- यानंतर, अर्ज भरण्यासाठी जनरेट केलेला युजर आयडी (User ID) आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI