Gnaan U Education : दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 'ऑल इन वन' वेबसाईट; आता कॉलेजचा कट-ऑफ, करिअरबाबत मार्गदर्शन एका क्लिकवर
कॉलेजचा कट ऑफ, रिझर्व्हेशन आणि करिअरबाबत मार्गदर्शन या सर्व गोष्टी तुम्हाला एका क्लिकवर मिळणार आहेत.
Gnaan U Education : दहावी पास झाल्यानंतर चांगलं कॉलेज निवडण्यासाठी पालक आणि विद्यार्थी शोधा-शोध सुरु करतात. काही विद्यार्थ्यांचे पालक हे त्यांच्या नातेवाईकांच्या मुलांकडून कॉलेजची चौकशी करतात. तर काही विद्यार्थी शहरांमधील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्याचा निर्णय घेतात. पण कॉलेजचा कट ऑफ, रिझर्व्हेशन आणि करिअरबाबत मार्गदर्शन या सर्व गोष्टी तुम्हाला एका क्लिकवर मिळणार आहेत. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य कॉलेज निवडण्यासाठी आता Gnaan U Education तुमची मदत करणार आहे. जाणून घेऊयात या वेबसाईटबद्दल....
मिळेल कॉलेजच्या कट ऑफची माहिती
ज्ञानेश मेहता यांनी एबीपी माझाला या वेबसाईटबद्दल माहिती दिली, महाराष्ट्रामध्ये जवळपास 1500 कॉलेज आहेत. तर मुंबईमध्ये 830 पेक्षा जास्त कॉलेज आहेत. एवढ्या कॉलेजमधून चांगलं कॉलेज निवडण्यासाठी Gnaan U Education या वेबसाईटचा वापर विद्यार्थी करु शकतात. ओपेन, ST,OBC या सर्व कॅटेगिरीजचा कोटा आणि कट ऑफ यांची माहिती देखील तुम्हाला या वेबसाईटमध्ये एकही रुपये न भरता मिळू शकते. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती यांसारख्या शहरांमधील महाविद्यालयांची माहिती तुम्हाला या वेबसाईवर मिळेल.
वेबसाईटमधील कॅटेगिरीज
वेबसाईमध्ये काही कॅटेगिरीज देखील आहेत. या कॅटेगिरीजमध्ये दहावी पास झालेली विद्यार्थी माहिती मिळवू शकतात-
Interest Test : या कॅटगिरीमध्ये लॉग इन केल्यावर सर्व कोर्सेसची माहिती तुम्हाला या कॅटेगिरीमध्ये मिळेल.
Career App मोबाईल अॅप आहे. हे Android अॅप आहे. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला वेबसाईटची माहिती मोबाईलवर मिळेल.
Career Video : विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्सचे व्हिडीओ आहेत. यामध्ये युट्युबवरील व्हिडीओ तुम्ही पाहू शकता.
Career Games : करिअर गाईडन्स थिमवर आधारित खेळ या सेक्शनमझध्ये आहेत. कार्ड गेम्स, बोर्ड गेम्स सारखे गेम्स तुम्ही या सेक्शनमझध्ये खेळू शकता.
हेही वाचा:
CBSE Result 2022 : CBSE टर्म-2 10वी-12वीचे निकाल लवकरच जाहीर होणार, 'या' वेबसाइटवर करा चेक
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI