(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICSE Board 10th Result : आज आयसीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल, येथे पाहा निकाल
ICSE Board 10th Result 2022 : आयसीएसई बोर्डाचा (ICSE Board) दहावीचा निकाल रविवार (17 जुलै) रोजी सायंकाळी पाच वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे.
ICSE Board Result 2022 : आयसीएसई बोर्ड परीक्षेचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही सत्रांना समान महत्त्व देऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 17 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी https://results.cisce.org/ या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकणार आहेत. तसेच मार्कशीट डाऊनलोडही करू शकणार आहेत.
काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) आज आयसीएसईच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. बोर्डाने यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोना परिस्थितीमुळे मागील शैक्षणिक वर्षात आयसीएसई दहावी बोर्डाची परीक्षा दोन सत्रात झाली होती. पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये तर दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिल-मे 2022 मध्ये झाली होती. आता या दोन्ही परीक्षांना समान वेटेज देऊन अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी सत्र एक आणि सत्र दोन या दोन्ही परीक्षा दिल्या आहेत त्या विद्यार्थ्यांचा निकाल आज जाहीर होईल. ज्या विद्यार्थ्यांनी सत्र एक किंवा सत्र दोन मधील एकही परीक्षा दिली नसेल तर अनुपस्थित म्हणून निकाल येईल. शाळा सुद्धा प्रिन्सिपल लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून निकाल पाहू शकतील.
येथे पाहा निकाल
- निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आयसीएसई बोर्डाच्या https://results.cisce.org/ या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.
- यासाठी वेबसाईटवर ICSE Board Result 2022 या लिंकवर क्लिक करा.
- येथे तुमचा युनिक आयडी आणि क्रमांक प्रविष्ट करा.
- आता तुम्हाला निकाल पाहता येईल.
- याशिवाय तुम्ही SMS द्वारेही निकाल पाहू शकता.
- यासाठी तुम्हाला ICSE<Space><Unique Id> हा मेसेज 09248082883 या क्रमांकावर पाठवा. यानंतर तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे तुम्हाला निकाल पाहता येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- NEET UG 2022 : आज नीट यूजी परीक्षा, परीक्षा केंद्रांवर कोविड नियमांचं पालन
- आंतरराष्ट्रीय अवार्ड मिळालेल्या शिक्षकाबाबत चुकीचं काम होऊ नये, डिसले गुरुजींच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे निर्देश
- NIRF Ranking 2022: NIRF कडून भारतातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांचे मानांकन घोषीत, महाराष्ट्राचे नाव नाही, आश्चर्याची बाब समोर
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI