HSC Exams : बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरता येणार, शिक्षण मंडळाचा निर्णय
HSC Exams : बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियोजित आहेत. परंतु, परीक्षेचा अर्ज शेवटच्या क्षणापर्यंत भरण्याची मुभा शिक्षण मंडळानं दिली आहे. 23 एप्रिलपासून परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना अतिविशेष अतिविलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येणार आहे.
मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शिक्षण मंडळानं बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. आता बारावीच्या परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत परीक्षेचा अर्ज भरता येणार आहे. पण त्यासाठी विद्यार्थ्यांना 8,250 रुपये परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. 23 एप्रिलपासून परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना अतिविशेष अतिविलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येईल. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा अर्ज शेवटच्या क्षणापर्यंत भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियोजित आहेत. परंतु, परीक्षेचा अर्ज शेवटच्या क्षणापर्यंत भरण्याची मुभा शिक्षण मंडळानं दिली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर बारावीच्या परीक्षेवर घेण्यात येणार असल्याची माहिती देखील टोपे यांनी जाहीर केलं होतं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत परीक्षेसंदर्भात एकमताने निर्णय घेण्यात आला.
दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अभ्यास करून या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करता येईल तसेच या संदर्भात केंद्र सरकारच्या सूचना याचा विचार केला जाईल आणि त्याचा निर्णय जाहीर केला जाहीर करण्यात येणार असल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. तसेच काही तज्ज्ञांशी, महाराष्ट्र बोर्डासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या.
दहावीच्या परीक्षा रद्द, अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करणार?
दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यानंतर आता विद्यार्थ्यांचं मुल्यांकन कोणत्या आधारावर केलं जाणार, याबाबतीत विद्यार्थी आणि पालक यांच्यात कमालीची उत्सुकता आणि तेवढाच संभ्रमही पाहायला मिळत आहे. परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश कोणत्या आधारावर देण्यात येणार? याबाबतीतही अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, अकरावीच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेचा पर्याय असून शिक्षण विभाग त्यावर चर्चा करत असल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना पास करुन पुढच्या वर्गात प्रवेश दिला जातो. त्यानंतर नववीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. तसेच दहावीच्या परीक्षेसाठी सीबीएसई बोर्ड आणि आयसीएसई बोर्डात सेमिस्टर पद्धत असते. तसेच याव्यतिरिक्त अंतर्गत मूल्यांकनही होत असतं. याआधारावर विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल दिला जाऊ शकतो. परंतु, महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची केवळ बोर्डाची परीक्षा पार पडत असते. तसेच अंतर्गत मूल्यांकनही फक्त 20 गुणांचंच असतं. त्यामुळे परीक्षा रद्द केल्यानंतरही विद्यार्थ्यांना कशाच्या आधारावर गुण द्यायचे, हा प्रश्न कायम आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maharashtra Board Exams 2021: राज्यात एसएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द : आरोग्यमंत्री राजेश टोपे
- Maharashtra Board Exams 2021 : दहावीच्या परीक्षा रद्द, अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करणार?
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI