CUET UG Result 2022 : CUET UG चा निकाल जाहीर, 'असा' चेक करा निकाल, NTA कडून ट्विट
CUET UG Result 2022 : निकाल जाहीर झाला असून परीक्षार्थी CUET UG च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.
CUET UG Result 2022 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून आज सकाळी अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्ससाठी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) 2022 चा निकाल (CUET UG Result 2022) जारी करण्यात आला आहे. परीक्षार्थी CUET UG च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचा निकाल (CUET UG Result 2022) पाहू शकतात.
CUET (UG) 2022 Results declared. pic.twitter.com/OkSLNHT5yD
— National Testing Agency (@DG_NTA) September 15, 2022
NTA कडून ट्विट
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) काल 15 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्ससाठी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) 2022 चा निकाल (CUET UG Result 2022) जारी करणार होती, ज्यात लिहले होते, की निकालाला विलंब होऊ शकतो. NTA ने रात्री 10 वाजता ट्विट करून माहिती दिली की, आम्ही CUET (UG) 2022 च्या निकालांवर काम करत आहोत. अजून काही वेळ लागू शकतो. (CUET UG Result 2022), मात्र आज सकाळी 5 वाजता हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
We are working at the results of CUET (UG) 2022. It may take some more time.
— National Testing Agency (@DG_NTA) September 15, 2022
अधिकृत वेबसाईटवर पाहा निकाल
CUET UG 2022 ची परीक्षा 16 जुलै ते 30 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली. परीक्षार्थी https://cuet.samarth.ac.in/ या लिंकवर क्लिक करून CUET UG 2022 चा निकाल (CUET UG Result 2022) पाहू शकतात. तसेच, खाली दिलेल्या टिप्स फॉलो करून, तुम्ही निकाल देखील पाहू शकता. (CUET UG Result 2022) या शैक्षणिक सत्रापासून UGC द्वारे अनुदानित सर्व 45 केंद्रीय विद्यापीठांमध्ये पदवीपूर्व प्रवेश CUET स्कोअरद्वारे केले जातील. दरम्यान, भारतीय विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना CUET मधून सूट देण्यात आली आहे.
हेल्पलाइन क्रमांक जारी
CUET UG मध्ये 44 केंद्रीय विद्यापीठांसह एकूण 90 विद्यापीठे सहभागी आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने CUET UG 2022 परीक्षेसाठी हेल्पलाइन क्रमांक 011-40759000 आणि 011-69227700 जारी केले आहेत. कोणत्याही समस्या असल्यास, उमेदवार cuet-ug@nta.ac.in वर मेल करू शकतात
CUET UG निकाल 2022 कसा तपासाल?
CUET UG च्या अधिकृत वेबसाईट https://cuet.samarth.ac.in/ ला भेट द्या.
CUET UG Result 2022 लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
तुमचा CUET UG निकाल 2022 स्क्रीनवर दिसेल.
CUET UG निकाल 2022 तपासा आणि सेव्ह करा.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI