CUET UG 2022: परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख; कसा कराल अर्ज?
CUET 2022 Application Form : कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (CUET) 2022 साठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे.
CUET 2022 Application Form : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (CUET) 2022 साठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप फॉर्म भरला नाही, त्यांच्याकडे अर्ज करण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 मे होती. मात्र, तारीख पुढे ढकलण्यात आली होती. विद्यार्थी CUET 2022 चा अर्ज भरण्यासाठी उमेदवार cuet.samarth.ac.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेला बसण्यासाठी इच्छुक असणारे विद्यार्थी आता भारतातील 73 केंद्रीय आणि राज्य विद्यापीठांमध्ये UG प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.
फी भरण्याची वेळ
परीक्षेसाठी अर्ज करण्याची ही शेवटची संधी असून इच्छुक विद्यार्थी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क रात्री 11.50 पर्यंत भरु शकतात.
फॉर्ममध्ये दुरुस्त करण्याची वेळ
NTA ने विद्यार्थ्यांना 22 मे 2022 ते 31 मे 2022 पर्यंत CUET 2022 चा अर्ज दुरुस्त करण्याची आणि संपादित करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी भरलेल्या अर्जामध्ये काहीही बदल करायचा असेल, तर 22 मे ते 31 मे पर्यंत ते अर्जात बदल करु शकतात.
किती भाषांमध्ये होणार परीक्षा?
प्रवेश परीक्षा हिंदी (Hindi), मराठी (Marathi), गुजराती (Gujrati), तमिळ (Tamil), तेलुगु, कन्नड, मल्याळम, उर्दू (Urdu), आसामी, बंगाली, पंजाबी, उडिया आणि इंग्रजी (English) अशा 13 भाषांमध्ये घेतली जाणार आहे. दरम्यान, CUET 2022 च्या परीक्षेच्या तारखा NTA कडून अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. अधिकृत अधिसूचनेनुसार, CUET 2022 ची परीक्षा जुलै 2022 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात घेतली जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- CISCE Exams 2022 : पुढील वर्षापासून CISCE बोर्डाची वर्षातून एकदाच परीक्षा; आता दोन टर्ममध्ये परीक्षा होणार नाही
- Nagpur University Exam : नागपूर विद्यापीठाकडून अखेर उन्हाळी परीक्षांच्या तारखांची घोषणा,विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अतिरिक्त वेळ
- UPSC CDS 2 Exam 2022 : यूपीएससी एनडीए 2 परीक्षेचं नोटिफिकेशन आज येण्याची शक्यता, अर्ज भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
- CBSE Term 2 10th 12th Result 2022 : CBSE टर्म 2 चा निकाल कधी जाहीर होणार? जाणून घ्या तारीख, वेळ
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI