CBSE Term 2 10th 12th Result 2022 : CBSE टर्म 2 चा निकाल कधी जाहीर होणार? जाणून घ्या तारीख, वेळ
CBSE Term 2 10th 12th Result 2022 : CBSE 10वी टर्म 2 निकाल 2022 आणि CBSE टर्म 2 12वी निकाल 2022 वेळेवर जाहीर करण्यासाठी उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम जोरात सुरू आहे
CBSE Term 2 10th 12th Result 2022 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) CBSE 10वी आणि 12वीची परीक्षा एप्रिल 2022 मध्ये सुरू झाली. CBSE बोर्डाची 10वी टर्म 2 परीक्षा 24 मे पर्यंत आणि 12वीची परीक्षा 15 जून 2022 पर्यंत होणार आहे. यंदा सीबीएसई बोर्डाची परीक्षा दोन टर्ममध्ये घेतली जात आहे. दरम्यान CBSE ने टर्म 2 निकाल 2022 साठी मूल्यमापन प्रक्रिया सुरू केली आहे. CBSE 10वी टर्म 2 निकाल 2022 आणि CBSE टर्म 2 12वी निकाल 2022 वेळेवर जाहीर करण्यासाठी उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम जोरात सुरू आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सीबीएसई टर्म 2 चा निकाल 2022 जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घोषित करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
CBSE टर्म 2 निकाल 2022 मूल्यमापन प्रक्रिया
CBSE इयत्ता 10वी 12वी टर्म 2 च्या बोर्ड परीक्षा सध्या सुरू आहेत. बोर्डाने एकाच वेळी CBSE टर्म 2 निकाल 2022 साठी मूल्यांकन प्रक्रिया देखील सुरू केली आहे. ती वेळेत पूर्ण करण्याच्या उद्देशाने शिक्षकांनी उत्तरपत्रिकांची छाननी सुरू केली आहे. CBSE निकाल जाहीर करण्याच्या उद्देशाने बोर्डाने मूल्यांकनाच्या कामाची गतीही दुप्पट केली आहे.
उत्तरपत्रिका तपासण्याचे टार्गेट
बोर्डाने शिक्षकांना उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे. यापूर्वी एक शिक्षक एका दिवसात 22 उत्तरपत्रिका तपासत होते, आता शिक्षकांना दररोज 35 उत्तरपत्रिका तपासण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. उत्तरपत्रिका लहान असल्याने एकूण प्रतींची संख्या दुप्पट झाली आहे. यासोबतच मुल्यांकनाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण व्हावे, याची दक्षता घेण्यासही बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
CBSE टर्म 2 चा निकाल 2022 कधी जाहीर होणार?
बोर्डाने टर्म 2 निकाल जाहीर करण्याची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. ताज्या अहवालानुसार, CBSE टर्म 2 चा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात घोषित केला जाईल. CBSE इयत्ता 10वी टर्म 2 बोर्ड परीक्षा 24 मे 2022 रोजी संपेल. सर्व प्रमुख पर्यायी विषयांच्या परीक्षा यापूर्वीच घेण्यात आल्या आहेत. CBSE इयत्ता 10 वी हिंदी तसेच इतर भाषेच्या पेपर्ससह काही व्यावसायिक विषयांच्या परीक्षा प्रलंबित आहेत आणि पुढील आठवड्यात पूर्ण होतील. CBSE 12वी बोर्डाची परीक्षाही आता सुरू असून या परीक्षा 15 जून 2022 रोजी संपणार आहेत.
CBSE टर्म 2 निकाल 2022 तारीख वेळ
सुत्रांच्या माहितीनुसार, CBSE परीक्षा पूर्ण झाल्यानंतर 20 दिवसांच्या आत CBSE टर्म 2 निकाल घोषित केला जाईल असा अंदाज लावला जात आहे. यावेळी बोर्डाचे उद्दिष्ट सीबीएसई टर्म 2 चा निकाल वेळेपूर्वी जाहीर करणे आहे. सीबीएसईच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बोर्ड सीबीएसई इयत्ता 10वीचा निकाल 2022 जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. तर CBSE टर्म 2 12वीचा निकाल 2022 जूनच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे. 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक सत्र प्रभावित होऊ नये. यासाठी सीबीएसई टर्म 2 10वीचा निकाल जूनमध्ये जाहीर केला जाऊ शकतो. मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 10 वी आणि 12 वीचे बोर्ड टर्म 1 आणि टर्म 2 चे अंतिम CBSE निकाल 2022 जारी करेल.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- BPSC Admit Card : बीपीएससीच्या पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले जाणार, जाणून घ्या कसं कराल डाऊनलोड
- DNB PDCET 2022 : डीएनबी पीडीसीईटी 2022 ची नोंदणी सुरु, 'या' दिवशी मिळणार प्रवेश पत्र
- UGC on Pakistan Degree : पाकिस्तानमधून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात मिळणार नाही रोजगार, UGC चा निर्णय
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI