एक्स्प्लोर

CBSE Certificate Scam: पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही दोन शाळांकडे सीबीएसईचं बोगस प्रमाणपत्र, शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांची माहिती

CBSE Certificate Scam पुणे शहरातील तीन शाळांबरोबरच जिल्ह्यातील आणखी बारा शाळांची नावे समोर आली आहेत . त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई : पुण्यापाठोपाठ मुंबईतल्या दोन शाळांनीही सीबीएसईचं (CBSE) बोगस प्रमाणपत्र मिळवल्याचं चौकशीत उघडकीस आलं आहे. या दोन्ही शाळांची माहिती पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालकांकडून मंत्रालयातील शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईतल्या त्या दोन शाळांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

 पुण्यातील तीन शाळांनी सीबीएसईचं बोगस प्रमाणपत्र (CBSE Certificate Scam) मिळवल्याचं नुकतंच उघडकीस आलं होतं. त्यानंतर मंत्रालयातून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पुणे उपसंचालकांना देण्यात आले होते. शिक्षण उपसंचालकांकडून चौकशीची ही जबाबदारी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी के. डी. भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आली होती. भुजबळ यांनी केलेल्या चौकशीत पुण्यातील तीन शाळांशिवाय मुंबईतील दोन शाळांच्या नावंही सीबीएसईचं बोगस प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे.

 पुण्यातील तीन शाळांच्या नावे बोगस प्रमाणपत्र मिळवल्याचं उघडकीस आल्यानंतर पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण उपसंचलक विभागाने चौकशी सुरु केल्यानंर पुण्यातील तीन शाळांबरोबरच पुणे जिल्ह्यातील आणखी बारा शाळांची नावे समोर आली आहेत . त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.  सीबीएसईचं बोगस प्रमाणपत्र देणारं रॅकेट कार्यरत असून 666 शाळा प्रमाणपत्र घेतल्याचा संशय आहे.  

12 लाख रुपयांच्या मोबदल्यात शाळांना बनावट प्रमाणपत्र विकणारी टोळी कार्यरत

12 लाख रुपयांच्या मोबदल्यात शाळांना CBSE ची मान्यता असल्याचे बनावट प्रमाणपत्र विकणारी टोळी कार्यरत असल्याचं समोर आले आहे . त्यासाठी मंत्रालयातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्यांचा वापर करण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून पुण्यातील तीन शाळांची चौकशी सुरु झाली . मात्र या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकारी व्यक्त करत आहेत.  या टोळीने ज्या शाळांकडे असे प्रमाणपत्र आधीपासूनच आहे अशा शाळांचा इनवर्ड नंबर घेऊन त्याआधारे बनावट प्रमाणपत्र तयार केलं आहे.  सध्या या प्रकरणाची चौकशी शिक्षण अधिकारी करत आहे . पण या गुन्ह्यांचं स्वरूप गंभीर आहे आणि व्यप्ती मोठी आहे . त्यामुळे या प्रकरणाचा तडा लावायचा असेल तर  या प्रकरणाची पोलीस यंत्रणेमार्फत निष्पक्ष चौकशी होण्याची गरज आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

CBSE Bogus Certificate : सीबीएसईचं बोगस प्रमाणपत्र देणारं रॅकेट, 666 शाळां प्रमाणपत्र घेतल्याचा संशय

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
उद्धव ठाकरे म्हणाले ॲनाकोंडा, अमित शाहांवरील टीका भाजपला झोंबली; दोन मंत्र्यांकडून जशास-तसं प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरे म्हणाले ॲनाकोंडा, अमित शाहांवरील टीका भाजपला झोंबली; दोन मंत्र्यांकडून जशास-तसं प्रत्त्युत्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahayuti Tussle: 'मुंबईचा महापौर खान होईल', BMC जागावाटपावरून महायुतीत नवा वाद Special Report
BJP Office Mumbai : भाजप कार्यालय भूमीपूजनावरून वाद, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी Special Report
Zero Hour'मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही', Bacchu Kadu यांचा थेट CM Fadnavis यांना इशारा
Pune Land Row: पुणे जैन बोर्डिंग वाद: मोहोळ-धंगेकर लढाईत नवा पेच Special Report
Sushma Andhare on Nimbalkar : ४८ तासांत माफी मागा', Nimbalkar यांची Andhare यांना ५० कोटींची नोटीस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
उद्धव ठाकरे म्हणाले ॲनाकोंडा, अमित शाहांवरील टीका भाजपला झोंबली; दोन मंत्र्यांकडून जशास-तसं प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरे म्हणाले ॲनाकोंडा, अमित शाहांवरील टीका भाजपला झोंबली; दोन मंत्र्यांकडून जशास-तसं प्रत्त्युत्तर
Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातून परतला, चाहत्याचा  2027 च्या वर्ल्डकपचा प्रश्न, हिटमॅननं काय उत्तर दिलं? 
रोहित शर्मा मुंबईत दाखल,चाहत्याचा 2027 च्या वर्ल्ड कपविषयी थेट प्रश्न, हिटमॅन काय म्हणाला?
ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; निर्धार मेळाव्यातील घणाघाती भाषण
ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; निर्धार मेळाव्यातील घणाघाती भाषण
मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला आग; धुराच्या लोटातून 200 जणांची सुटका
मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला आग; धुराच्या लोटातून 200 जणांची सुटका
आरोपी अन् महिला डॉक्टरचे वारंवार चॅटिंग; पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे, एसपींनी दिली माहिती
आरोपी अन् महिला डॉक्टरचे वारंवार चॅटिंग; पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे, एसपींनी दिली माहिती
Embed widget